Kishori Pednekar: 'लोक थोडी LATE कळाली, पण PERFECT कळाली! ठाकरेंच्या 'वाघीणी'चा रोख कुणाकडे?

Kishori Pednekar: ठाकरे शिवसेनेची'वाघीणी' अशी ओळख असलेल्या किशोरीताईंना या पोस्टमुळे त्या नाराज आहेत का? असा संशय निर्माण होतो. पण त्यांची नाराजी पक्षातील कुणावर आहे. हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
Kishori Pednekar:
Kishori Pednekar: Sarkarnama
Published on
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टि्वट करीत खळबळ उडवून दिली आहे. ठाकरेच्या शिवसेनेतील आक्रमक नेत्या पेडणेकरांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्यांचा रोख कुणाकडे आहे, हे समजले नाही. त्यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

ठाकरे शिवसेनेची'वाघीणी' अशी ओळख असलेल्या किशोरीताईंना या पोस्टमुळे त्या नाराज आहेत का? असा संशय निर्माण होतो. पण त्यांची नाराजी पक्षातील कुणावर आहे. हे मात्र गुलदस्त्यातच आहे. त्यांची केलेल्या पोस्टची चर्चा होत आहे. नेटकऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहे.त्यांच्या सूचक टि्वटने चर्चांना उधाण आले आहे.

समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा आला, असे किशोराताईंनी म्हटलं आहे. कुणी आपलं नसतं हे आपल्यांनीच शिकवलं, असे सांगत 'लोक थोडी LATEकळाली, पण PERFECT कळाली, असे त्यांनी टि्वट मध्ये म्हटलं आहे.

दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुलीची आत्महत्या नाही, तर हत्या आहे असं त्यांचा दावा आहे. आदित्य ठाकरे या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप झाले आहेत. त्‘दिशा सालियानचे आई-वडिल दबावाखाली आहेत’ असं किशोरी पेडणकेर यांनी म्हटलं आहे.

Kishori Pednekar:
Nagpur Violence: फडणवीस राबविणार 'योगी पॅटर्न'; नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोजर चालविणार

“मूळात हे संपूर्ण मॅटर कोर्टात आहे. ज्या गोष्टी घडल्या नाहीत, त्या गोष्टी घडल्यात असं ज्याचं म्हणणं आहे, त्यांना रीतसर कोर्टातून उत्तर दिलं जाईल” असं स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.

(न्यूज अपडेट होत आहे)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com