देशमुखांची दिवाळी कोठडीत पण फराळ घरचा!

ईडीने देशमुखांना मध्यरात्री अटक केली आहे.
Anil Deshmukh
Anil Deshmukh
Published on
Updated on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukhh) यांना सक्तवसुली संचालनालयाने मध्यरात्री (ED) अटक केली आहे. त्यांना मंगळवारी दुपारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर सहा नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे देशमुखांना यंदाची दिवाळी कोठडीत घालवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. पण असे असले तरी त्यांना घरचे जेवण मिळणार आहे.

ईडीचे मुंबईतील अधिकारी सुलतान यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून देशमुख यांची चौकशी सुरू केली होती. रात्री आठनंतर ईडीचे दिल्लीतील अधिकारी सत्यव्रतसिंह हे मुंबईत दाखल झाल्यानंतर देशमुख यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली.

Anil Deshmukh
केंद्रीय मंत्री अन् खासदाराच्या मतदारसंघातच भाजपचा धुव्वा

देशमुख यांना अटक केल्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करून विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. देशमुखांच्या वतीने जामीनासाठी प्रयत्न करण्यात आले. तर ईडीच्या वकिलांनी देशमुखांना 14 दिवस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयाने देशमुखांना काहीसा दिलासाही दिला आहे. तसेच कोठडीमध्ये घरचे जेवण व औषधे देण्याची देशमुखांनी केलेली मागणीही न्यायालयाने मान्य केली. कोठडीत ईडीकडून चौकशी केली जात असताना देशमुखांच्या वकिलांना हजर राहण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे.

देशमुख यांच्याबद्दलचा घटनाक्रम

मार्च २०२१ - परमबीर सिंह यांचे १०० कोटी वसुलीबाबतचे पत्र

५ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

१४ एप्रिल रोजी अनिल देशमुख सीबीआय चौकशीला हजर ९ तास झाली होती चौकशी

५ जून रोजी हजर राहण्याचे पहिले समन्स

२५ जून रोजी देशमुखांच्या नागपूर व मुंबईतील घरावर छापे

२६ जून रोजी देशमुखा़ंना दुसरे समन्स

५ जुलै रोजी हजर राहणयाबाबत तिसरे समन्स

१६ जुलै रोजी देशमुखांची ४ कोटीची संपती जप्त केली (जप्तीमध्ये वरळीतील घर व उरणच्या धुतुम गावातील जमीनीचा समावेश)

१८ जुलै रोजी अनिल देशमुखांच्या नागपूरच्या काटोल येथील घरावर ईडीचे छापे

३०जुलै अनिल देशमुखने ईडी विरोधात सुप्रिम कोर्टत घेतली धाव

१६ आँगस्ट अनिल देशमुखाची याचिता सुप्रिमकोर्टाने फेटाळली

१८ आँगस्ट रोजी अनिल देशमुख यांना चौथं समन्स

आँगस्ट महिन्यातच ५वं समन्स बदावण्यात आलं

२ सप्टेंबर रोजी सीबीआयचा अनिल देशमुखांचा अहवाल झाला लिक

चौकशीला हजर रहात नसल्यामुळे ५ सप्टेंबर - ईडीची लूक ऑऊट नोटीस

३० आँक्टोंबर मुंबई उच्च न्यायालयाने ईडी विरोधात अनिल देशमुखाची याचिका फेटळली.

१ नोव्हेंबर अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीला ११ :३० वा वकिल इंद्रपाल सिंह सोबत हजर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com