Video: भाजप नेत्याची पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी; शक्ती प्रदर्शनासाठी काढली कार रॅली; ट्रॅफिक जामनं नागरिक वैतागले

पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना आवाहन केलंय की, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी होईल यासाठी प्रयत्न करा.
BJP Leader
BJP Leader
Published on
Updated on

BJP Leader Car Rally at Bhopal : पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना आवाहन केलंय की, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी होईल यासाठी प्रयत्न करा. पण मोदींच्या या आवाहनाला धाब्यावर बसवत भाजपच्याच एका नेत्यानं शक्तीप्रदर्शनासाठी मोठी कार रॅली काढल्याचा आणि त्यामुळं वाहतूक कोंडी करुन जनतेला वेठीस धरल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

BJP Leader
Monsoon Arrival: दुष्काळाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याची खूशखबर! 'या' तारखेला मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज

मध्य प्रदेशातील भोपाळमधील हा व्हिडिओ असून इथले भाजप नेते सौभाग्य सिंह ठाकूर यांची मध्य प्रदेशच्या पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाचे अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यानंतर त्यांना भलतचं आनंदाचं भरतं आलं आणि त्यांनी शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सायकल रॅली किंवा बाईक रॅली नव्हे तर थेट ५०० कारची रॅलीच काढली. यामुळं एकाचवेळी रस्त्यावर अनेक चारचाकी गाड्या आल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यामुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

BJP Leader
CM Vijay news : विजय यांनी घेतला तमिळनाडूसह संपूर्ण देशातील जनतेच्या मनातला निर्णय; भाजप, काँग्रेसलाही 'ते' जमलं नाही...

दरम्यान, या प्रकारामुळं आता पंतप्रधानांच्या आवाहनाला भाजपचेच नेते मंडळी, कार्यकर्ते, मंत्र्यांनी हरताळ फासली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर सोशल मीडियातून युजर्स पंतप्रधानांसह भाजपच्या नेत्यांवर टीका करायला लागले आहेत. कारण मोठ-मोठ्या रॅलीज काढायला पंतप्रधानांसह भाजपचे नेते मंडळीच पुढे असल्याचा त्यांचा सोशल मीडियातला सूर आहे.

BJP Leader
Mumbai Pune Expressway Alternative: मुंबईला जाण्यासाठी पुणेकरांना नवा सुपरफास्ट मार्ग; नेरळ-शिरूर महामार्गाला हिरवा कंदील

पंतप्रधानांचं आवाहन काय?

पंतप्रधान मोदींनी दोन दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये त्यानंतर काल गुजरातच्या वडोदरात पुन्हा एकदा भारतीयांना आवाहन केलं की, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, खाद्य तेल कमी प्रमाणावर खा, वर्षभर सोने खरेदी करु नका, कंपन्यांनी वर्क फ्रॉर्म होम, ऑनलाईन कॉन्फरन्स त्याचबरोबर शाळांनी देखील ऑनलाईन वर्ग घेण्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं आहे. यामागे येण्याजाण्यासाठी पेट्रोल-डिझेलची बचत होऊन परदेशी चलन वाचवता येईल, असं मोदींचं म्हणणं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com