Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट

Swarajya Sanghatana Worker Attack on Jitendra Awhad Jeep Car:आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्याची जबाबदारी स्वराज पक्षाने स्वीकारली आहे. संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे स्वराज पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी सांगितले.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी नवी मुंबईतून एकाला घेतलं ताब्यात घेतलं आहे. स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि अंकुश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघांचा शोध पोलिस घेत आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांची गुरुवारी गाडी फोडली होती. जितेंद्र आव्हाड हे ठाण्याकडे जात असताना पी डिमेलो रोडवर त्यांच्यावर गाडीवर हल्ला झाला होता.

आव्हाड यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न करणे, गुन्हेगारी कट रचणे आणि दंगल माजवण्याचा दोघांवर आरोप आहेत.आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्याची जबाबदारी स्वराज पक्षाने स्वीकारली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे स्वराज पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी सांगितले.

संभाजी राजेंची चूक होती. विशाळगडावर जे काही झालं, ते त्यांच्या आडून झालं. त्यांची भूमिका योग्य नव्हती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती. हे मी आज देखील सांगत आहे. राजर्षी शाहू महाराजांचं रक्त सर्वांना बरोबर घेऊन जाणारांचं रक्त होतं. त्यांचं भांडण लावणारं रक्त नव्हतं. शाहू महाराजांचा विचार एक टक्का देखील संभाजीराजेंमध्ये नाही, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

Jitendra Awhad
Suhas Diwase on Pooja Khedkar: ‘मला एकटीला त्यांनी रुममध्ये बोलावलं’, पूजा खेडकर यांच्या आरोपांवर दिवसे म्हणाले, ...मोजून तीन वेळा भेटलो!

ही लढाई विचारांची आहे.पण तुम्ही ज्या विचारांवर जात आहात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते.हे तुमच्या वडिलांचे सुद्धा विचार नाहीत.मुलाने आपल्या वडिलांचे विचार खोडून टाकावं हे नजीकच्या इतिहासात कधी घडलं नाही.वडिलांनी तुमचा निषेध करणं हे बेदखल करण्यासारखं असल्याची जळजळीत टीका संभाजीराजेंवर त्यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हल्ल्यानंतरही संभाजी राजेंसंदर्भात केलेल्या विधानावर माफी मागण्यास नकार दिला. जीव गेला तरी संभाजी राजेंची माफी मागणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com