Shiv Sena MLA Disqualification : आम्हीच शिवसेना ; ठाकरे गटाचा युक्तीवाद ; नार्वेकरांकडे २६२ पानी उत्तर सादर..

Maharashtra Politics : शिंदे-ठाकरे गटाच्या प्रतोदांनी परस्परविरोधी गटातील आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.
Shivsena MLA Disqualification News
Shivsena MLA Disqualification News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्रतेविषयी नोटीस पाठवली आहे. दोन्ही गटापैकी ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी काल (मंगळवारी) २६२ पानी लेखी उत्तर नार्वेकरांकडे सादर केले आहे.

दोन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली आहे. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना ही नोटीस जारी केली आहे.

Shivsena MLA Disqualification News
NCP MLAs Meet Sharad Pawar: शरद पवारांची भेट कशासाठी; संभ्रम निर्माण करणे अन् कारवाईची धार कमी करण्यासाठीच ?

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून एकमेकांच्या आमदारांच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आला आहे.

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवली आहे. आपण शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यावर निर्णय घेऊ, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं.शिंदे-ठाकरे गटाच्या प्रतोदांनी परस्परविरोधी गटातील आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही.

एकनाथ शिंदे गटाच्या चाळीस आमदारांनाही अध्यक्षांनी नोटीस पाठवली होती. त्यांची अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. यापूर्वीच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी बाजू मांडण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती. आता मुदत संपल्यानंतर आता शिंदे गट कधी व काय बाजू मांडतो याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Shivsena MLA Disqualification News
Monsoon Session 2023 : आमदार प्रवीण दटकेंनी वाढवल्या कुलगुरू सुभाष चौधरींच्या अडचणी !

तीन जुलै २०२२ रोजी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उद्धव यांच्याविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे, भरत गोगावलेंसह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती, असे ठाकरे गटाचे म्हणणं आहे.

भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून शिंदे गटाने ४ जुलै २०२२ रोजी नियुक्ती केली. गुवाहाटीत हा निर्णय घेण्यात आला. त्याला ३४ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करण्यात आला होता. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, आम्ही १४ जण हेच खरी शिवसेना आहोत, अस त्यांनी म्हटलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com