Thane News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेलं ठाणे गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आलं आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर ठाणे शहरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर आता ठाणे पोलिस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.17 नोव्हेंबर)समोर आली आहे. संबंधित हॅकरकडून पोलिस आयुक्तांचं मोबाईलमधील व्हॉट्सअॅप अकाउंट ताब्यात घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
थेट ठाण्यासारख्या मोठ्या शहराच्या पोलिस आयुक्तांचाच मोबाईल हॅक झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच पोलिस आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकारीही स्वत:चा सायबर अटॅकपासून बचाव करु शकले नसल्याचं समोर येत आहे. गंभीर बाब म्हणजे पोलिस आयुक्तांच्या मोबाईलवरुन हॅकरनं व्हाटस अप स्टेटसवर अश्लील व्हिडीओ अपलोड केल्यानं पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शहर पोलिसांकडून सतर्क झाले आहेत. त्यांच्याकडून तातडीनं मोबाईल हॅक करणाऱ्याचा युध्दपातळीवर शोध सुरू आहे. या घटनेमुळे ठाणे शहर पोलिस दलातही खळबळ उडाली आहे.
मोबाईल व्हॉट्सअप हॅक करुन डुंबरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर अश्लील व्हिडीओ ठेवण्यात आल्यामुळे हॅकर्सचा नेमका उद्देश काय आहे, याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र, आयुक्तांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे ठाणे पोलिसांमध्ये वेगळीच कुजबुज सुरु आहे.
अज्ञात सायबर गुन्हेगाराने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले. अकाउंट हॅक केल्यानंतर संबंधित हॅकरने आयुक्तांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अश्लील व्हिडीओ शेअर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.