Tanaji Sawant News : तानाजी सावंतांचे विद्यार्थ्यांना पदभरतीचे गाजर; 20 महिन्यापासून प्रतिक्षाच

State Government News : आरोग्य विभाग गट 'क' व गट 'ड' साठी २०२१ मध्ये तब्बल ६ हजार २०५ पदांसाठी परीक्षा झाली होती.
Tanaji Sawant News
Tanaji Sawant NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

State Government Recruitment : आरोग्य विभाग गट 'क' व गट 'ड' साठी २०२१ मध्ये तब्बल ६ हजार २०५ पदांसाठी परीक्षा झाली होती. मात्र, परीक्षापूर्वीच उत्तरपत्रिका व्हायरल आल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. सहा महीन्यात सर्व आरोग्य विभागाच्या जागा भरतो असे आश्वासन देणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी परिक्षा घेण्याची अनास्था दाखवल्याने लाखो विद्यार्थी हवालदिल झालेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या आरोग्य विभागातील गट 'क' आणि 'ड' या संवर्गातील तब्बल ६ हजार २०५ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आल्याने तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ही परीक्षाच रद्द केली होती. त्यानंतर या प्रकरणात काही लोकांना अटकदेखील झाली. त्यानंतर लवकरच ही परीक्षा नव्याने घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आज जवळपास दोन वर्षे होत आली, तरी या परीक्षेला मुहूर्त मिळेना. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Tanaji Sawant News
K.Chandrasekhar Rao : 'बीआरएसकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही'; आघाडीने घेतला धसका? पवार, पटोले, राऊत म्हणाले...

आरोग्य विभागाची ही परीक्षा रद्द करून जवळपास २० महिन्यांचा कालावधी लोटला. तरीही सरकार याबाबत काहीही निर्णय घेत नाही. परीक्षा शुल्कापोटी कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य शासनाला (State Government) मिळाला. परीक्षा कधी होणार, याकडे विद्यार्थी डोळे लावून बसले आहेत. तर, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आरोग्य विभाग गट 'क' साठी २४ ऑक्टोबर २०२१ ला, तर गट 'ड' साठी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी परीक्षा झाली होती. मात्र, परीक्षापूर्वीच उत्तरपत्रिका बाहेर आल्याचे दिसून आल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती.

Tanaji Sawant News
BJP News : भर रस्त्यात भाजपा खासदार अन् पोलीस निरीक्षक भिडले; व्हिडीओ व्हायरल

आरोग्य विभाग गटनिहाय जागा

गट क - २७३९ जागा

गट ड ३४६६ जागा

एकूण जागा ६२०५

अर्ज दाखल केलेले एकूण विद्यार्थी ८ लाख ६६ हजारांपेक्षा जास्त

परीक्षा रद्द होऊन २० महिने होत आले आहेत; मात्र, आताचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोणत्याही प्रकारची परीक्षा होण्यासाठी हालचाल केल्याचे दिसत नाही, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे महेश घरबुडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.