..तर राज ठाकरे हे मुख्यमंत्रीच होतील!

Eknath Shinde| Shivsena|Raj Thackeray : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काही मिनिटे चर्चा झाली आहे.
Raj Thackeray,  Eknath Shinde Latest News
Raj Thackeray, Eknath Shinde Latest Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना आमदारकी वाचवायची असेल तर त्यांना कोणत्याही पक्षात जाता येईल. मनसेमध्ये (MNS) बंडखोर आमदार गेल्याने त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर ती ऐतिहासिक घटना असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे.

Raj Thackeray,  Eknath Shinde Latest News
अपक्ष आमदार अग्रवाल यांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी एका शिवसैनिकाला अटक

शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला ठाकरे नाव आणि हिंदुत्व दोन्ही सोडायचे नाही. अशा परिस्थितीत शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. कारण शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. यावर राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray,  Eknath Shinde Latest News
फडणविसांचा `सागर` बंगला बनलाय हालचालींचे केंद्र! `वर्षा`वर जायची लगबग

बंडखोर आमदार एमआयएम, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. बंडखोरांमुळे मनसेला पर्यायाने राज ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर ती ऐतिहासिक गोष्ट असेल, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली. तसेच आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा कोणत्याही पक्षात जाऊ शकतात, असेही राऊतांनी स्पष्ट केले. मात्र, ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला, मोठे केले, त्याच पक्षाचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शिंदेंचा राज ठाकरेंना दूरध्वनी

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना रविवारी (ता. 27 जून) दूरध्वनी केला. रविवारी सायंकाळी शिंदेंनी राज ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिंदे आणि राज यांच्यामध्ये काही मिनिटे प्रकृती संदर्भातील चर्चा झाली. राज यांना शनिवारी रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर राज शनिवारी घरी परतल्याचे त्यांनीच ट्विटरवरुन जाहीर केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com