Praful Patel On PM Post : "…तर तेव्हाच शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते," प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा !

Praful Patel On Sharad Pawar PM Post : "शरद पवारांच्या पाठिशी सर्वे लोक होते.."
Praful Patel On Sharad Pawar PM Post
Praful Patel On Sharad Pawar PM PostSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत पंतप्रधानपदासंबंधी साततत्याने चर्चा होत असते. अनेकदा यावर राजकीय टीका-टिपण्णी होत असते. मात्र याचं खंडन करत, पवारांनी या शक्यतेला अनेकदा फेटाळून लावले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केले आहे.

“माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा हे पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर इंद्रकुमार गुजराल नाही, तर शरद पवार हेच देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पटेलांनी हा दावा केला आहे.

Praful Patel On Sharad Pawar PM Post
Sanjay Raut News : जाहिरातकांडावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा बनाव ; मयुर शिंदेबाबत राऊतांचे ..

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मला एका गोष्टीची नेहमी खंत वाटत आलेली आहे. हीच खंत शरद पवार यांनासुद्धा आहे. १९९६ या वर्षी माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांचा सरकारला दिलेला पाठिंबा काँग्रेसकडून सीताराम केसरी यांनीच काढला. यावेळी काँग्रेस पक्षात जे काही अंतर्गत एकूणच वातावरण होतं, त्यामुळे पक्षातील सर्वच लोक १०१ टक्के शरद पवारांच्या पाठिशी होते. यावेळी जर शरद पवार ठाम राहिले असते, तर देवगौडा यांच्यानंतर इंद्रकुमार गुजराल यांच्याऐवजी शरद पवारच पंतप्रधान झाले असते," असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

पटेल पुढे म्हणाले, "यावेळी आम्ही नक्कीच कुठेतरी कमी पडलो. लोकसभा निवडणुकी होऊन ११ महिने झाले होते, केसरी यांनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढला. यावेळी काँग्रेसची परिस्थितीही चांगली म्हणावी, अशी नव्हती. याच काळात शरद पवार हे एक संसदीय नेते होते. देवेगौडा सरकार गेल्यानंतर निवडणुका लागण्याची शक्यता होती," असे ही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Praful Patel On Sharad Pawar PM Post
Nitin Deshmukh : शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे बंडाच्या एक महिना आधीच ठरलं होतं..

लोकसभा निवडणुका होऊन ११ महिने झाले होते. एवढ्या कमी कालावधीत पुन्हा निवडणुका परवडणार नव्हत्या. नव्याने निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा निवडून येऊ का? याबाबत शंका होती. सीताराम केसरींनी सरकारचा पाठिंबा काढला. कारण त्यांनी वाटत होतं की, त्यांना स्वत:ला पंतप्रधान पदाची संधी मिळेल, असेही प्रफुल पटेल यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.