Uddhav Thackeray News : त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशि...', 'उबाठा'च्या उल्लेखावरून ठाकरेंनी सुनावलं

Uddhav Thackeray On Narendra Modi : "मराठी द्वेष्ट्यांना बळ देण्यासाठी मोदी मुंबईत रोड शो करणार आहेत का?" उद्धव ठाकरेंचा उपस्थित केला सवाल.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

Mumbai, 12 May : 2022 मध्ये शिवसेनेत ( Shivsena ) उभी फूट पडली. नंतर निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षालला 'मशाल' चिन्ह अन् 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नावं दिलं. तेव्हा, शिंदे गट आणि भाजपकडून ( Bjp ) ठाकरेंच्या पक्षाला 'उबाठा' म्हणून डिवचलं जातं. यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा पूर्ण उल्लेख टाळत हल्लाबोल केला आहे. "त्यांची शिवसेना म्हणजे, ‘एसंशिं…’ म्हणजे त्यांचे जे पूर्ण नाव आहे, ते मी घेऊ पण इच्छित नाही," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची 'सामना'साठी मुलाखत घेतली आहे. तेव्हा, भाजप, एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीकेचे बाण सोडले आहेत. "राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना या आईच्या कुशीवर तर तुम्ही वार केलाच," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांची शिवसेना म्हणजे, ‘एसंशिं…’ म्हणजे त्यांचे जे पूर्ण नाव आहे, ते मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात. तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे, ए सं शिंदे त्याचा फुलफॉर्म काय आहे? कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. त्यांना लाज वाटत असेल तर मी का त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ?"

"तुम्ही गद्दारी करून राजकारणातल्या आईशी ह******पणा केलात, शिवसेनेशी गद्दारी केलीत. राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना या आईच्या कुशीवर तर तुम्ही वार केलाच; पण महाराष्ट्राशीही तुम्ही गद्दारी केलीत. ती महाराष्ट्रात नाही चालणार," असं उद्धव ठाकरेंनी खडसावून सांगितलं.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : "मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं, आता...", उद्धव ठाकरेंचा इशारा

"मराठी द्वेष्ट्यांना बळ देण्यासाठी मोदी मुंबईत रोड शो करणार आहेत का? हा प्रश्न आहे. मराठी माणूस दाखवेल नं त्यांना काय दाखवायचंच ते! पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भले गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, अगदी मुस्लिमसुद्धा… कोरोना काळामध्ये आपण जे काम केलं, ते हे लोक कधीच विसरलेले नाहीयेत. मी जात व प्रांतभेद केला नाही," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: PM मोदींच्या ऑफरचा उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार, म्हणाले; "कधी मला डोळा मार तर कधी..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com