Thackeray Brothers Alliance Result : मुंबईत धडधड वाढली, ठाकरेंनी बंधूंना किती जागा? भाजपच्या मोठ्या मंत्र्याने थेट आकडा सांगितला!

BMC Election Uddhav Thackeray Chandrakant Patil : मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येणार याचा अंदाज वर्तवताना मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार याची आकडेवारी भाजपच्या मोठ्या मंत्र्याने सांगितली आहे.
Thackeray brothers alliance
Thackeray brothers alliance Sarkarnama
Published on
Updated on

BMC Election: महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. राज्याचे संपूर्ण लक्ष मुंबईत काय होणार याकडे लागले आहे. ठाकरे बंधूंची युती चत्मकार घडवणार की भाजप-शिंदेंची युती सत्ता मिळवणार याची चर्चा आहे. यामध्ये भाजपच्या मोठ्या मंत्र्याने ठाकरे बंधूंना किती जागा मिळतील, याची आकडेवारी सांगितली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना 29 महापालिकांपैकी 28 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येईल, असे भाकीत वर्तवले. तसेच मुंबईला कोणाला किती जागा मिळणार याची आकडेवारी देखील सांगितले. ते म्हणाले, माझा अंदाज कधीच चुकत नाही. भाजप आणि शिवसेनेला किती जागा मिळणार हे मी नंतर कानात सांगेल.

पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेला किती जागा मिळणार याची आकडेवारी सांगताना म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेना 45 जागा मिळतील तर, राज ठाकरेंच्या मनसेला 20 जागा मिळतील. मुंबईत सत्तेवर भाजप-एकनाथ शिंदेंची शिवसेना येईल. आणि महायुतीचा महापौर होईल.

Thackeray brothers alliance
Sunil Tatkare Politics: ‘त्या’ महिला उमेदवार थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनाच भिडल्या; या कारणाने रंगला निवडणुकीतच राष्ट्रवादीत वाद?

चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी सांगली आणि पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा केला होता. त्यांनी सांगितले होते की, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला 115 जागा मिळणार तर सांगलीत भाजपला 55 जागा मिळतील, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

मराठी महापौर होणार...

ठाकरे बंधूंनी दावा केला की मुंबईत त्यांचीच सत्ता येणार असून मराठी महापौर होणार. भाजपकडून देखील दावा करण्यात येतो आहे की, महायुतीचा महापौर होणार. हिंदू मराठी हा भाजपचा महापौर असेल.

Thackeray brothers alliance
Dada Bhuse Politics: नवी मुंबईची परतफेड शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मालेगावात केली, भाजप नेत्यांना भरला दम!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com