
Uddhav Thackeray News : विधानसभा निवडणुकीत झालेल्या परावभवानंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी 'मातोश्री'वर ते बैठका घेत आहेत. मुंबई महाापलिकेत भाजपसोबत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान असणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातच एकनाथ शिंदेंना घेरण्याची तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे.
'मातोश्री'वर आज (सोमवारी) उद्धव ठाकरे हे ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय आढाव घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील महापालिकेच्या तयारीच्या दृष्टिने हा आढाव घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद पूर्वी सारखी राहिली नसल्याने या ठिकाणी स्वबळावर लढायचे की आघाडीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदेंना घेरून त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याची संधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला असणार आहे. त्यामुळे या ठाणे महापालिकेसाठीच्या रणनीतीच्या चर्चा उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी बोलून ठरवण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. तसेच मुंबई बाहेर आम्ही आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मजबूत आहे. त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीसोबत ठाणे महापालिका निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.