Uddhav Thackeray News : चंद्रपुरातील शिवसैनिक 'मातोश्री'वर; उद्धव ठाकरेंनी दिला "हा आदेश

Shivsena UBT News : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नाही.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. पक्षाच्या फुटीनंतरही आपण सारे शिवसेनेसोबत ठामपणे उभे आहात. हीच आमची खरी ताकद आहे. आगामी प्रत्येक निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवा, हेवेदावे विसरून जिंकण्याचा निर्धार करून कामाला लागा. मोदी सरकारने नऊ वर्षांत केवळ फसवी आश्वासनं दिली आहेत. त्यांच्याकडून देशवासीयांची झालेल्या फसवणुकीची माहिती गावागावांपर्यत घराघरापर्यंत पोहाेचवा, असा आदेश शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभाचा आढावा घेण्यासाठी मातोश्रीवर चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्याची बैठक नुकतीच घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. राज्यात विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. दरम्यानच्या काळात शिवसेनेतून शिंदे गट फुटला अन् आता अजित पवारांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडली.यामुळे राज्यातील राजकारणात प्रचंड गोंधळलेली स्थिती आहे.

Uddhav Thackeray News
Sushma Andhare On Bhuse : ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्री भुसेंचा फोन; अंधारेंचा गंभीर आरोप

आमदारकीच्या एका एका जागासांठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे.अशात आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी सारेच पक्ष कामाला लागले आहेत.विविध पक्ष वेगवेगळे उपक्रम राबवून जनतेपर्यत पोहचत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही आता होऊ द्या चर्चा हा उपक्रम राज्यभर राबवत मोदी सरकारच्या फसव्या योजनेचा भांडाफोड केला. महाविकास आघाडीचा(Mahavikas Aaghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नाही. जिल्ह्यातील भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात पक्षाची मोठी ताकद आहे.

यापूर्वी या क्षेत्रातून शिवसेनेचा आमदार निवडून आला होता.याचकरिता या क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना यावेळी उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. वेळ पडली तर स्वतंत्रपणे सहाही विधानसभा क्षेत्र लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी महाविकास आघाडीतून पक्षाच्या वाट्याला दोन जागा देण्यात यावा अशी मागणी केली.

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम,जिल्हाप्रमुख संदीप गि-हे,जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोेडे,सिक्की यादव,आशिष कावटवार,प्रकाश पाठक प्रशांत गटूवार,सुरज माडूरवार,राहुल विरूटकर यांच्यासह अनेक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गटबाजीचे दर्शन

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटात गटबाजी आहे. जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व विधानसभा अध्यक्ष रवींद्र शिंदे या गटात नियुक्त्यावरून वाद रंगला. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करून परतल्यानंतर मातोश्रीवर खासदार विनायक राऊत व अनिल देसाई यांच्यासमोर या दोन्ही गटांच्या गटबाजीचे प्रदर्शन समोर आले.

यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दोन्ही गटांच्या समर्थकांनी आपापल्या नेत्यांची बाजू मांडली. दरम्यान, या मुद्द्यावर दसरा मेळाव्यानंतर एक विशेष बैठक लावली जाईल व यावर नक्कीच तोडगा काढला जाईल, असे विनायक राऊत, अनिल देसाई यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav Thackeray News
Beed District Cooperative Bank : बीड जिल्हा बँकेच्या कर्ज मागणीच्या प्रस्तावाकडे सरकारचा कानाडोळा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.