डेलकर यांना शिवसेनेत टिकवून दाखवा; राणेंनी दिलं आव्हान

राणे यांनी कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या उमेदवार नसून अपक्ष होत्या, असं सांगितलं.
Uddhav Thackeray, Narayan Rane
Uddhav Thackeray, Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दादरा-नगर हवेली लोकसभा निवडणुकीत कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्राबाहेरील पक्षाच्या पहिल्या खासदार असल्याचे सांगत शिवसेनेकडून (Shiv Sena) मोठा जल्लोष करण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी आता थेट दिल्लीकडे कूच करणार असल्याचे संकेत दिले. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला.

राणे यांनी कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या उमेदवार नसून अपक्ष होत्या, असं सांगितलं. शिवसेनेने त्या आपल्या उमेदवार असल्याचा डंका पिटला. पण त्यांची निशाणी फलंदाज होती. डेलकर या अपक्ष उमेदवार आहेत. यापूर्वी मोहन डेलकर अपक्ष म्हणून सातवेळी निवडून आले होते. आता त्यांच्या पत्नी निवडूण आल्या आहेत. त्यांच्या जीवावर त्या निवडून आल्या आहेत. शिवसेनेचे तिथे काही नाही. शाखाप्रमुखही नाही. आता निवडून आल्यावर आपला उमेदवार असं म्हणत आहेत.

Uddhav Thackeray, Narayan Rane
पवार कुटुंबीयांच्या दिवाळी पाडवा कार्यक्रमाला अजितदादा अनुपस्थित; हे आहे कारण

संजय राऊत यांना लिखाण करताना भान नसते. रात्री करायच्या गोष्टी ते दिवसा करतात, असं त्यांचं लिखाण बघून वाटतं. मोदींच सरकार बहुमतात आहे. त्यामुळे दिल्लीत धडक मारायला आले तर डोकं राहणार नाही. तिथे डोक्याविना संजय राऊत दिसतील. भाजप, मोदींवर टिकेचा भडीमार सुरू आहे. दिल्लीत धडक मारायला आलात तर डोके ठिकाणावर राहणार नाही. तुमचे जे आता 56 आमदार आणि 18 खासदार आहेत ते मोदींच्या जीवावर आले आहेत. तुम्ही डेलकर यांना शिवसेनेच्या खासदार म्हणता, मग त्यांना टिकवून दाखवा, नाहीतर काही दिवसांनी भाजपमध्ये येतील, असं आव्हान राणे यांनी राऊतांना दिलं.

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. नुकत्याच बारामतीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोडंभरून कौतुक केलं होतं. त्यावर निशाणा साधताना राणे यांनी ठाकरे यांची पवारांवर टीका केलेल्या जुन्या भाषणांची काही वाक्य वाचून दाखवली. त्यानंतर राणे यांनी मुख्यमंत्री पदावर बसवलं म्हणून यांनी निष्ठा विकली, अशी टीका केली.

Uddhav Thackeray, Narayan Rane
राज्य सरकार इंधनावरील कर कमी करणार का? शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून यांनी मुख्यमंत्री पद मिळवले. आता शरद पवारच आपले सर्वकाही आहे, असं ठाकरे म्हणतात. त्यावेळी मात्र त्यांच्यावर टीका केली होती. बारामतीत जाऊन मात्र किती कौतुक केले. हे कौतुक मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून आहे. पण शेतीबाबत काही बोलले नाही. शेतकरी आत्महत्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांबाबत काही बोलले नाही. फक्त डायलॉगबाजी केली, अशी टीका राणे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com