Vasai News : जुन्या नेतृत्वाला धक्का, परिवर्तन पॅनलने जिंकली वसई पिपल्सची बाजी; विद्यमान चेअरमन पराभूत!

Vasai Peoples Consumer Store Election : निवडणुकीत माजी चेअरमन नितीन केशव म्हात्रे यांच्या सहकार विकास पॅनलची थेट लढत सुरेश प्रभाकर वर्तक यांच्या परिवर्तन पॅनलशी झाली.
Members of the Change Panel celebrate their victory in the Vasai Peoples Consumer Store election after defeating the incumbent leadership.
Members of the Change Panel celebrate their victory in the Vasai Peoples Consumer Store election after defeating the incumbent leadership.sarkarnama
Published on
Updated on

Vasai News : वसई तालुक्यातील सर्वात जुन्या सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या वसई तालुका पिपल्स मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्यादित या संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली.

निवडणुकीनंतर झालेल्या मतमोजणीत विद्यमान चेअरमन नितीन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनलचा दारुण पराभव झाला असून, सुरेश प्रभाकर वर्तक यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवत संस्थेत सत्तांतर घडवून आणले आहे.

या निवडणुकीत माजी चेअरमन नितीन केशव म्हात्रे यांच्या सहकार विकास पॅनलची थेट लढत सुरेश प्रभाकर वर्तक यांच्या परिवर्तन पॅनलशी झाली होती. संस्थेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने वर्चस्व राखले. सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांना ३०० मतांचाही टप्पा गाठता आला नाही. तर परिवर्तन पॅनलचे उमेदवार मोहन उद्धव घरत यांना सर्वाधिक ७२९ मते मिळाली.

या निवडणुकीत सहकार विकास पॅनलला केवळ एक बिनविरोध जागा मिळाली. देवेंद्र नाईक हे बिनविरोध निवडून आले होते.

वसई तालुका पिपल्स मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराची स्थापना थोर नेते अण्णासाहेब वर्तक यांनी केली होती. तसेच पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या कार्यकाळात संस्थेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. बदलत्या काळात सहकारी ग्राहक भांडारांची संकल्पना काहीशी मागे पडली असली तरी वसई पिपल्स ग्राहक भांडार आजही कार्यरत असून या निवडणुकीतील निकालाने संस्थेच्या नेतृत्वात मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे.

Members of the Change Panel celebrate their victory in the Vasai Peoples Consumer Store election after defeating the incumbent leadership.
Lohagad Fort Accident: जयपूरमध्ये शाही विवाह, दोन विमानांचे बुकिंग; लग्नाच्या 10 दिवस आधीच लोहगडावर काळाचा घाला

निवडून आलेले उमेदवार :

हर्षवर्धन अनंत कवळी, मोहन उद्धव घरत, जयप्रकाश दत्तात्रय चौधरी, कुमार प्रभाकर नाईक, नारायण गजानन नाईक, दिलीप वामन पाटील, रविंद्र मधुकर मोहोळ, प्रतीक प्रभाकर राऊत, रविंद्र गणपत राऊत, नंदकुमार तात्याजी वर्तक, सुरेश प्रभाकर वर्तक, शुभांगी सतीश वर्तक.

महिला राखीव जागा :

नयन अरुण चौधरी, स्मिता सुरेश वर्तक.

ओबीसी राखीव जागा :

सुरेश राऊत.

बिनविरोध निवड :

देवेंद्र नाईक.

Members of the Change Panel celebrate their victory in the Vasai Peoples Consumer Store election after defeating the incumbent leadership.
BJP Vs Shivsena : 700 कोटींच्या उलाढालीवर भाजप-शिवसेनेचा डोळा: मंत्री, आमदार अन् खासदारांनी लावली फिल्डिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com