

Vasai Virar Assault Case : वसई-विरार परिसरात पैशांच्या व्यवहारातून एका व्यक्तीला शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात वसई-विरार महापालिकेतील बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अरशद जैनुल्ला चौधरी यांच्यासह पूजा राजकुमार सरोज आणि इतर तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार फैजान मुन्ना शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते सोपारा फाटा परिसरातील मोहसीन अब्बासी वकिल यांच्या कार्यालयात होते. याचवेळी पूजा सरोज तीन तरुणींसह कार्यालयात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी पैशांच्या व्यवहारावरून शेख आणि संबंधितांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. तसेच पूजा सरोज हिने शेख यांचा शर्ट फाडून त्यांच्या गालावर चापट मारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोहसीन यांनी डायल 112 वर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधितांना बोलावून घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात नगरसेवक अरशद चौधरी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. चौधरी यांनी संबंधित तरुणींना तक्रारदाराला मारहाण करण्यास प्रवृत्त केल्याचा दावा फैजान शेख यांनी केला आहे.
मात्र, चौधरी यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. या घटनेशी आपला कोणताही संबंध नसून आपले नाव विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण घटनेचा कथित व्हिडिओही समोर आला आहे. प्रकरणी पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.