Sharad Pawar: "आम्ही कुठेही जाणार नाही, ज्यांना यायच त्यांनी आमच्यासोबत यावं"; शरद पवारांचं मोठं विधान

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. शरद पवारांच्या विधानाची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
Sharad Pawar_NCP
Sharad Pawar_NCP
Published on: 
Updated on: 

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेतेय हे पाहावं लागणार आहे. शरद पवारांच्या विधानाची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत शरद पवारांनी हे विधान केलं. पवार म्हणाले, "आम्ही कोणाबरोबरही जाणार नाही, ज्यांना यायचंय त्यांनी आमच्यासोबत यावं. विरोधीपक्षात येऊन काम करा, सत्तेमध्ये जाणार नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळं एका अर्थानं आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळू शकतो. पण सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या या विधानावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही"

Sharad Pawar_NCP
Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच मोठा निर्णय होणार; रोहिणी खडसेंचं पद जाणार, नव्या महिला प्रदेशाध्यक्षा ठरल्या?

दरम्यान, अजित पवारांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये अजित पवार हे आपल्या पक्षाच्यावतीनं एकटेच शरद पवारांच्या नेत्यांसोबत बैठक करताना दिसत आहेत. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. हीच चर्चा अद्यापपर्यंत अधुनमधून सुरुच होती. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या चर्चांवर स्पष्टपणे कुठलंही भाष्य करण्यात येत नव्हतं. पण आता खुद्द शरद पवारांनीच अगदीच स्पष्टपणे यावर भाष्य केल्यानं, या चर्चांवरचा पडदा पडला आहे.

तसंच शरद पवारांचे सहकारी असलेले जितेंद्र आव्हाड यांनी पवारांच्या विधानावर भाष्य करताना म्हटलं की, "राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाबाबत काय होतं नव्हतं? याबाबत आज शरद पवार स्पष्टच बोलले ना, की आम्ही कोणा बरोबरही जाणार नाही. त्यामुळं याबाबत आणखी काय स्पष्टता हवी आहे. शरद पवारांनी म्हटलंय की ज्यांना कोणाला आमच्यासोबत यायचं आहे त्यांनी यावं. कोणासाठी आमचे दरवाजे बंद आहेत असं सांगितलेलं नाही. पण मूळ चिन्हाबाबतचा जो विषय आहे ती याचिका सुप्रीम कोर्टात आहे त्यावर निर्णय येईल तेव्हा बघू. शेवटी राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे, आमचंच बाळ आहे हे आम्ही अमान्य करतच नाही"

Sharad Pawar_NCP
Supriya Sule: काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, मला अन् शरद पवारांना...

पण दुसरीकडं सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या या विधानावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळं यावर काय भाष्य केलं जातंय याकडंही सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com