Praful Patel On Sharad Pawar : शिंदे गुवाहाटीला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार होती; पटेलांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

NCP May Join BJP Last Year : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५१ आमदारांच्या सह्यांचेही पत्र दिल्याचा पटेलांचा दावा
Praful Patel, Sharad Pawar
Praful Patel, Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP Crisis, Praful Patel And Sharad Pawar : गेल्या वर्षी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काही आमदार गुवाहटीला गेले होते. या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यावेळी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५१ आमदारांचे पत्र तयार होते. मात्र ऐनवेळी शरद पवार यांनी निर्णय घेतला नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संधी साधली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केला आहे. (Latest Political News)

Praful Patel, Sharad Pawar
NCP Crisis And Eknath Shinde : राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "आता आम्ही..."

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना पटेलांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रफुल पटेल म्हणाले, शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे गुवाहटीला गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार होती. त्यावेळी पक्षाच्या ५१ आमदारांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतरही पवार यांनी निर्णय घेतला नाही. परिणामी एकनाथ शिंदे यांनी संधी साधली."

Praful Patel, Sharad Pawar
Bhagatsingh Koshyari On Maharashtra Politics : राजकीय भूकंपावर माजी राज्यपाल कोश्यारींची प्रतिक्रिया, "जैसे ज्याचे कर्म तसै.."

खासदार पटेल यांनी यावेळी आमच्यावर कुणाचाही दबाब नाही. भाजपसोबत जाण्याची प्रक्रिया वर्षभरापासून सुरू असल्याचेही सांगितले. प्रफुल पटेल म्हणाले, आम्ही सामूहिक निर्णय घेतला आहे. आमच्यावर ईडी किंवा इतर कुणाचाही दबाव नाही. गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर होते. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी भाजपसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनुकूल वातावरण होते. पक्षाच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना पत्र दिले होते. परंतु राष्ट्रवादीचे नेतृत्व वेळेवर निर्णय घेण्यात अयशस्वी ठरले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी संधी साधली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले"

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.