Navi Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकाला महिलेने चप्पल मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. भर रस्त्यात महिलेने नगरसेवक राम आशिष यादव यांना चप्पल मारल्याने एकच खळबळ उडाली. मात्र महिलेने हे कृत्य नेमके का केले? या समजू शकले नाही.
राम आशिष यादव हे नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. 2019 मध्ये एका तरुणीने त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. पीडितेला अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत दोन वर्ष अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
राम आशिष यादव हे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपकडून देखील नगरसेवक होते. त्यांनी निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यावर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. यादव नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेवर अत्याचार करणे, तिला घरत घुसून मारहाण करणे, मारामारी,दंगल माजवणे, हत्या अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नवी मुंबई महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र, येथे त्यांचा प्रमुख विरोधी एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असते. तर, भाजप देखील शिवसेनेला डिवचण्याची संधी सोडत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.