AIMIM leader joins shivsena : 'एमआयएम'ला मोठा धक्का, बड्या नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, जितेंद्र आव्हाडांची डोकेदुखी वाढणार

AIMIM Political Update News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहवयास मिळाली.
Shivsena, mim
Shivsena, mimSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News : राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार असल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहवयास मिळाली. महापालिका निवडणुकीनंतर ठाण्यात एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. मुंब्राऱ्यातील एमआयएमच्या बडा नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे. ठाणे पालिकेतील नगरसेविका व ‘कैसा हराया’ फेम सहर शेख हिचे वडील यूनूस शेख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यूनूस शेख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांची येत्या काळात डोकेदुखी वाढणार आहे.

ठाणे महापालिकानिवडणुकीनंतर केलेल्या वक्तव्यानंतर एमआयएम (MIM) पक्षाची नगरसेविका सहर शेख हिचे वडील यूनूस शेख चांगलेच चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वीच नगरसेविका सहर शेख हिचे एक भाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सहर शेख यांनी विजयानंतर 'कैसा हराया' म्हणत विरोधकांना डिवचले होते.

त्यानंतर तिने संपूर्ण मुंब्रा हिरवा करू, असा दावा देखील केला होता. मुंब्रा हिरवा करू इच्छिणाऱ्या सहर शेखच्या वडिलांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे समोर आले आहे. युनुस शेख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करतानाचा फोटोही समोर आला आहे. यामध्ये शिंदे सेनेचे पदाधिकारी युनुस शेख यांना नियुक्तीचे पत्र देताना दिसत आहेत. युनूस शेख यांच्या शिवसेना प्रवेशाची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. या प्रवेशानंतर युनूस शेख यांची शिवसेनेच्या अखिल भारतीय केबल सेना, कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय केबल सेना ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक शाखा आहे.

Shivsena, mim
Ulhasnagar Politics : एकाच प्रभागात सहा नगरसेवक; दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड! शिवसेनेसोबत भाजपचेही विशेष लक्ष

एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने युनूस शेख यांची नियुक्ती करत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. याच सहर शेखने महापालिका निवडणुकीच्या काळात मुंब्रा हिरवा करणार असे वक्तव्य भाषणात केले होते. तिचे वडील आता हिंदुत्वाच्या वाटेवर दिसून येत आहेत. युनूस शेख यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

Shivsena, mim
Shivsena News : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, नगराध्यक्षांसह अख्खी नगरपंचायतच एकनाथ शिंदेंच्या गळाला!

दरम्यान, सहर शेख हिचे वडील युनुस शेख हे एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक होते. मात्र, त्यानंतरच्या काळात दोघांमध्ये वितुष्ट आले होते. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युनुस शेख यांनी मुलीसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, उमेदवारी न दिल्यामुळे सहर शेख ही एमआयएमकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती आणि जिंकलीही होती. ही निवडणूक जिंकल्यानंतर विजयी सभेत युनुस शेख आणि सहर शेख या बाप-लेकीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com