'लेकीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येणार नाही; जितेंद्र आव्हाडांची निष्ठा शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच, डिलिमिटेशनवरून पक्षात खदखद!

NCP party stand on Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे संविधानाशी प्रतारणा असल्याची नताशा आव्हाड यांची भूमिका; जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे जो निर्णय घेतील, त्याबरोबर राहणार.
NCP leaders reaction to Delimitation Bill
Political differences within Sharad Pawar led NCPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra politics latest news on Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणे म्हणजे, देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे, असा घणाघात करत नताशा आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने या बिलाला पाठिंबा देण्यापूर्वी विचार करावा असा बेधडक सल्ला दिला होता.

नताशा आव्हाड यांच्या भूमिकेवरून, महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेष करून शरद पवार राष्ट्रवादीत एकच गदारोळ झाला. नताशा यांच्या या भूमिकेवर त्यांचे वडील, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांची काय भूमिका असेल, याकडे लक्ष लागले होते. आता जितेंद्र आव्हाड यांची देखील भूमिका समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष (NCP SP) डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देत असल्याचे वृत्त समोर येत आहेत. तशा चर्चांना देखील जोर पकडला आहे. यावर पक्षांतर्गत खदखद समोर येऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा यांनी या बिलाला पाठिंबा देणे म्हणजे, संविधानाशी प्रतारणा करण्यासारखे होईल, अशी समाज माध्यमांवर भूमिका व्यक्त केली.

यावरून बराच गदारोळ झाला. लेकीच्या या भूमिकेवर आता जितेंद्र आव्हाड यांनी मौन सोडत, लेक नताशा यांच्या भूमिकेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येणार नाही. पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशन बिलाबाबत घेतलेल्या निर्भीड आणि स्पष्ट भूमिकेचे स्वागत करतो, असे म्हटले आहे.

वाढत्या मतदार संख्येच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक असली, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधी पक्षांना मिळू शकणाऱ्या जागा मर्यादित करण्याचा आणि भाजपला (BJP) अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे, ही त्यांची भूमिका पूर्णपणे योग्य आहे. देशाची लोकशाही व्यवस्था आणि संविधान जपण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी ही भूमिका प्रेरणादायी आहे, असेही म्हणत नताशा यांच्या भूमिकेचे जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले आहे.

NCP leaders reaction to Delimitation Bill
NCP merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला भाजपचा 'ब्रेक'! दोन्ही गटांना प्रकाश आंबेडकरांनी ठरवले 'ए टीम-बी टीम'; पवारांवरही निशाणा!

पक्षीय हितपेक्षा देशहित आणि संवैधानिक नैतिकता महत्त्वाची मानून उघडपणे मत व्यक्त करण्याचे धाडस नताशा यांनी दाखवले आहे. अशा वेळी जेव्हा काही पक्ष सत्तेच्या गणितात अडकून मूलभूत मुद्दे बाजूला ठेवतात, तेव्हा अशी स्पष्ट भूमिका लोकशाहीसाठी आवश्यक ठरते, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

NCP leaders reaction to Delimitation Bill
Maharashtra Police Appeal Rules : पोलिसांना मोठा दणका! शिक्षेविरोधात आता एकदाच अपील; दुसऱ्यांदा दाद मागण्याचा मार्ग बंद

काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच या बिलाला विरोध करत आहे. महिला आरक्षणाचे स्वागत असले तरी, डिलिमिटेशनच्या नावाखाली लोकसभेच्या रचनात बदल करून विशिष्ट राज्यांना फायदा मिळवून देण्याचा आणि विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा प्रयत्न स्वीकारार्ह नाही. नताशा यांच्या भूमिकेने या मुद्द्यावरील व्यापक विरोधाला अधिक बळकटी दिल्याकडे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

अशा निर्भीड आवाजांची लोकशाहीत नेहमीच गरज असते. पक्षाने या भूमिकेचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा व्यक्त करताना, नैतिकतेचा विजय होवो, असे जितेंद्र आव्हाड यांनी शेवटी म्हणून, नताशाच्या भूमिकेचे समर्थन करताना, आपलाही डिलिमिटेशन बिलाला विरोध असल्याचे सूचकपणे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.