Anil Deshmukh : नगरपरिषद निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांकडून बोगस मतदान? माजी गृहमंत्र्यांनी पुरावेच दाखवले!

Anil Deshmukh News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप कार्यकर्त्यांनी धामणा गावातील नागरिकांना वानाडोंगरी नगरपरिषदेत मतदानासाठी आणल्याचे पुराव्यासह उघड केले.
Anil Deshmukh displays documented proof alleging BJP workers brought voters from another constituency to cast bogus votes in the Wanadongri municipal election.
Anil Deshmukh displays documented proof alleging BJP workers brought voters from another constituency to cast bogus votes in the Wanadongri municipal election.Sarkarnama
Published on
Updated on

Bogus Voting Evidence :नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदानाचे आरोप सातत्याने होत आहे. मात्र आजवर कोणी ते सिद्ध करू शकले नाही. राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बोगस मतदानाचे पुरावेच सादर करून निवडणुकीच्या पारदर्शकतेवरच बोट ठेवले आहे.

देशमुखांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातील धामणा गावातील जवळपास 118 लोकांनी शेजारी असलेल्या भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये मतदान केल्याचे त्यांनी सांगितले. धामणा गावातून शेकडोजण मतदानासाठी वानाडोंगरी येथे जात असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्याला दिली होती. ही माहिती हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश बंग यांना त्यांनी दिली.

यानंतर वानाडोंगरी येथील प्रभाग क्र. 12 मध्ये काही महिला मतदान करण्यासाठी पोहोचल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांना धामणा येथून भाजपाचे कार्यकर्ते व महामंत्री तुषार सरोदे यांनी मतदानासाठी आणल्याचे सांगितले. उमेदवाराचे नाव न सांगता कमळ चिन्हा समोरील बटन दाबण्यास आम्हाला सांगण्यात आल्याची माहिती संबंधित महिलांनी दिली.

Anil Deshmukh displays documented proof alleging BJP workers brought voters from another constituency to cast bogus votes in the Wanadongri municipal election.
Nagpur NCP : आता उमेदवारांनी स्ट्रॉंगरुम समोर झोपायचे का? सुरक्षा धोक्यात, पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार

यानंतर, या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असता, बांधकाम कामगाराच्या नोंदणीसाठी दिलेल्या कागदपत्रांचा आधार घेत धामणा येथील लोकांची वानाडोंगरी येथील मतदार यादीत नावे टाकण्यात आल्याची माहिती समोर आल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. यात धामणा येथील भाजपाच्या (BJP) ग्राम पंचायत सदस्या देवकू मोरेश्वर निखाडे यांच्यासह इतरांचा देखील समावेश आहे. ही संपूर्ण बोगस नावे वानाडोंगरी येथील प्रभाग क्रमांक 12 मध्ये टाकण्याचे काम भाजपाचे पदाधिकारी तुषार सरोदे यांनी केले आहे.

Anil Deshmukh displays documented proof alleging BJP workers brought voters from another constituency to cast bogus votes in the Wanadongri municipal election.
Anil Deshmukh Politics: सलील देशमुखांचा तडकाफडकी राजीनामा, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कुटुंबात ‘गृहकलह'; पण कोणामुळे ?

बोगस मतदान करण्यासाठी तुषार सरोदे यांनी प्रत्येक बोगस मतदाराला दोन हजार रुपये दिले. त्यांनी त्यांच्या पत्नीसह नातेवाईक व गावातील नागरिकांची नावे मतदार यादीत टाकली. यात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचेही अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. वानाडोंगरी येथे एकूण 12 प्रभाग आहेत. यातील 1ते 11 प्रभागांमध्ये जवळपास साडेतीन ते चार हजार मतदार आहेत. परंतु, एकट्या प्रभाग 12 मध्ये 7,613 मतदार कसे असा प्रश्न निर्माण झाला असता याच प्रभाग मोठया प्रमाणात बोगस मतदार नोंदी झाल्याचेसुद्धा समोर आले असेही अनिल देशमुख यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com