Nagpur News : लाजीरवाणं! माणुसकीच्या छाताडावर बसलेला विकास; नागपूरचा 998 कोटींचा उड्डाणपूल थेट घरामधून नेला; कुटुंबाला सोडलं वाऱ्यावर

Nagpur News : कुटुंबाचे म्हणणे आहे की त्यांना काही महिन्यांपूर्वीच नोटीस मिळाल्याने ते बेफिकीर पकडले गेले.
Nagpur Over Bridge
Nagpur Over Bridge
Published on
Updated on

Nagpur News : भोपाळचा ९० डिग्रीत वळणाऱ्या पुलाची सोशल मीडियात एवढा चेष्ठेचा विषय बनला होता की शेवटी हा पूल बनवणाऱ्या इंजिनिअरवर मध्य प्रदेश सरकारला कारवाई करावी लागली. आता असाच अजब पण लाजीरवाणा प्रकार नागपूर शहरात दसून आला आहे. इथल्या अशोका चौकात उभारण्यात आलेला फ्लायओव्हर एका घरामधून गेला आहे. या पुलाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हा माणुसकीच्या छाताडावर बसलेला विकास आहे! अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटू लागल्या आहेत.

Nagpur Over Bridge
Top 10 News: "जेव्हा देशाला गरज असते तेव्हा राहुल गांधी दांड्या मारतात" ते सुप्रीम कोर्टाचा एकच निर्णय, लाखांवर शिक्षकांची उडाली झोप

नेमका प्रकार काय?

दिघोरी-इंदौरा मार्गावर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) ९९८ कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात आलेला एक फ्लायओव्हर अर्थात उड्डाणपूल हा नागपूर शहरातील अशोका चौकातून जातो. या चौकातच असलेल्या एका दुमजली घराला भेदून हा पूल गेला आहे. या पुलाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नागपूर महापालिकेला लोक प्रश्न विचारु लागले आहेत. त्यानंतर जाग्या झालेल्या महापालिकेनं यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, यामध्ये चूक ही घर मालकाची आहे. या घरावर आता कारवाई केली जाणार आहे.

Nagpur Over Bridge
Anurag Thakur: जेव्हा देशाला गरज असते तेव्हा राहुल गांधी दांड्या मारतात! अनुराग ठाकूर यांची टीका

त्याचबरोबर या पुलावरुन होत असलेल्या टीकेला उत्तर देताना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणनं (NHAI) देखील आपली बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, पुलाची उभारणी करताना आम्ही या घराचं अतिक्रमण तपासलं होतं. नागपूर महापालिकेकडं आम्ही हे घर हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेनं देखील याचं व्हेरिफिकेशन केलं होतं. त्यात संबंधित घराची उभारणी बेकायदा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. NHAI नं पुढे म्हटलं क, या उड्डाण पुलाचा रोटरी बीम पृष्ठभागापासून दीड मीटर दूर आहे. पण घराच्या मालकानं त्याच्या प्लॉटच्या हद्दीबाहेर बाल्कनीचं बांधकाम केलं आहे. त्यामुळं बाल्कनीचा हा भाग लवकरच पाडला जाईल. दरम्यान, उड्डाणपुलाची उभारणी ही मान्यताप्राप्त डिझाईननुसार केला होता.

Nagpur Over Bridge
हिंसाग्रस्त मणिपूरसाठी PM मोदींनी केल्या 5 मोठ्या घोषणा

तर दुसरीकडं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलं की, हे घरं महापालिकेची परवानगी न घेता बांधलेलं आहे. सध्या या घरावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. हनुमान नगर झोनचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावनकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली.

Nagpur Over Bridge
Ind Vs Pak Asia Cup: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन भारतात पेटलं राजकारण! सरकारनं थेट नियमच सांगितला

नेमकी अडचण काय?

अशोका चौकात प्रवीण पत्रे नामक व्यक्तीचं दुमजली घर आहे. त्यांच्या घराला अगदी घासून म्हणजे अक्षरशः त्यांच्या घराच्या बाल्कनीतून या पुलाचा ऐलेव्हेटेड रोटरी बीमचा बाहेरचा भाग जातो. या पुलाबाबत माहिती देताना घरमालक प्रवीण पत्रे सांगतात, आमचं घर याच ठिकाणी दीडशे वर्षे जुनं आहे. सन २००० साली आम्ही घराची पुनर्बांधणी केली. पुलाचं बांधकाम करण्यापूर्वी काही महिने आधी आम्हाला याची माहिती संबंधित विभागानं दिली होती.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, या कुटुंबाचं म्हणणं आहे की काही महिन्यांपूर्वीच आम्हाला बांधकामाबाबत नोटीस मिळाली पण अद्याप आम्हाला कोणतीही भरपाई मिळालेली नाही, याबाबत महापालिकेनं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. या पुलाबाबत सोशल मीडियात मजेदार मीम्स होत आहेत, पण हा मजेचा भाग नाही तर आमचं दैनंदिन वास्तव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com