
Nashik News : नाशिक बाजार समितीत भाजपने प्रतिष्ठा पणाला लावून सत्तांतर घडवले. माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या गटाला सुरुंग लावला. पण आता पिंगळे विरुद्ध चुंभळे असा संघर्ष सुरू उफाळल्याचे बाजार समितीत पहायला मिळत आहे. तर बैठकीत समोर आलेल्या संघर्षाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.
नाशिक बाजार समितीच्या सत्तांतरानंतर संचालक मंडळाची पहिली बैठक शुक्रवारी (ता.28) झाली. या बैठकीत नियमित कामकाजापेक्षा राजकीय हेवेदाव्यांवरच भर दिला गेला. त्यामुळे आगामी कालावधीत बाजार समितीत राजकीय सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या गटातील नऊ संचालक भाजपच्या गोटात गेले. त्यासाठी शिवाजी चुंभळे यांनी साम-दाम दंड भेद अशी सर्व नीती वापरली. त्यात ते यशस्वी देखील झाले. हा माजी खासदार पिंगळे यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो.
आता सत्तांतर झाल्याने महायुतीच्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. त्याचा दुसरा अंक काल सुरू झाला. बाजार समितीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे. माजी खासदार पिंगळे यांनी मंजूर केलेला खत प्रकल्प बाजार समितीला नुकसान कारक असल्याचा दावा करत तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपदेखील सभापती कल्पना चुंभळे यांनी केला आहे. त्यांनी यावेळी विविध अनियमितता आणि आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला. याबाबत सर्व कारभाराचे कसून चौकशी केली जाईल, असाही इशारा दिला. यामुळे माजी सभापती पिंगळे यांच्यावर कारवाई केली जाईल असे आता बोलले जातेय.
दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. यापूर्वी पालकमंत्री असताना महाजन यांनी माजी खासदार पिंगळे यांच्या विरोधात पोलीस कारवाईचा ससेमीरा लावला होता. त्यात काही काळ पिंगळे यांना तुरुंगातही जावे लागले होते.
आता मंत्री महाजन यांच्या आशीर्वादानेच शिवाजी चुंभळे यांनी बाजार समितीत अविश्वास ठराव मंजूर केला. यासंदर्भात माजी खासदार पिंगळे यांनी जलसंपदा मंत्री महाजन तसेच चुंभळे यांच्यावर गंभीर आरोप केले. आपल्या गटातील संचालकांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याच्या आमिष दाखवले होते. आर्थिक ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन घडवल्याचा त्यांचा आरोप आहे.
निमित्ताने चुंभळे हे भाजपचे तर माजी खासदार पिंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आहेत. माजी खासदार पिंगळे यांची सत्ता खेळ खेळी करण्यात विरोधक नव्हे तर सहकारी पक्ष आणि सहकारी नेतेच कामाला लागले होते. त्यामुळे बाजार समितीत राजकीय संघर्षाचा दुसरा डाव सुरू झाला आहे. यामध्ये सत्ताधारी महायुतीच एकमेकांशी लढणार असल्याने तो चर्चेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.