Nashik News, 08 Mar : सायबर भामट्यांना रोखण्यासाठी विविध उपाय सातत्याने केले जात आहेत. मात्र हे प्रबोधन पुरेसे ठरत नाही असे चित्र दिसत आहे. विशेषत: नाशिकमध्ये फसवणुकीच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत.
राष्ट्रीयकृत बँकेचे क्रेडिट कार्ड देण्यासाठी आलेल्या फोनवरून व्यापाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. क्रेडिट कार्ड घेण्यासाठी संबंधितांचे बँक खाते हॅक करण्यात आले. त्यातून तिघांना ३१.४२ लाख गंडा घालण्यात आला आहे. नाशिक शहर हे सायबर भामट्यांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहे. गेल्या दोन वर्षात सायबर ठगांनी १११ कोटींना गंडा घालण्यात आला आहे.
यामध्ये प्रामुख्याने निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश अधिक आहे. या संदर्भात तीन व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शनिवारी एकच वेळी या तिघांना लुटण्यात आले. क्रेडिट कार्डच्या नावाखाली गंडा घालण्यात आला. क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली हा प्रकार झाला.
राष्ट्रीयकृत बँकेचे क्रेडिट कार्ड देण्याची प्रक्रिया करण्यात आली. साठी सातत्याने बनावट कॉल येत होते. ऑनलाइन प्रक्रियेसाठी "बँक लाइफ सर्टिफिकेट"हा ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. ॲप डाऊनलोड करतात संबंधितांनी तिघांना ३१ लाख ४२ हजार रुपयांना लुटले.
सोशल मीडियावर आलेल्या लिंक ओपन करणे, शेअर मार्केटच्या माध्यमातून जास्त पैसे देण्याचे अमित, क्रेडिट कार्ड माहितीसाठी ओटीपी मागणे आदी पारंपारिक कारणांनी सातत्याने फसवणूक होत आहे. गेल्या दोन वर्षात नाशिकच्या सायबर क्राईम ठाण्यात २१० गुन्हे दाखल झाले आहेत.
केवळ ३७ गुन्ह्यांचे आरोप पत्र न्यायालयात दाखल झाले. चोळ्या गुन्ह्यांचा तपास समरी दाखल करून थांबविण्यात आला. १५७ गुन्ह्यांचा तपासच लागलेला नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ऑनलाइन फसवणुकीमध्ये फसवणूक करणारे परराज्यात किंवा परदेशात नोंदणी केलेल्या फोनचा वापर करतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे आणि पैशाचे व्यवहार तपासणे बिकट असते. त्यासाठी अनेक खात्यांचा तपास करावा लागतो.
निवृत्त कर्मचारी आणि तरुणांना ज्यादा पैशांचे अमिष आणि क्रेडिट कार्ड हे फसवणुकीचे मुख्य माध्यम आहे. याबाबत सातत्याने प्रबोधन करण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिक सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. एकदा फसवणूक झाल्यावर ते पैसे परत मिळवणे बिकट असते. त्यामुळे हे प्रकार अधिक चिंताजनक होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.