Pimpri Chinchwad News : पिंपरीतील प्रशासकीय कारभाराला आमदार बनसोडे वैतागले, विधानसभेत आवाज उठवण्याचा दिला इशारा

Anna Bansode : विशिष्ट कंपनीसाठी प्रशासन मनमानी कारभार करत असाल, तर...
MLA Anna Bansode & PCMC
MLA Anna Bansode & PCMC Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri Chinchwad : भाजप पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत असताना २०१७ ते २०२२ पर्यंत भाजप पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत असताना अनेक निविदांत शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

प्रशासकीय राजवटीतही निविदेतील हा घोटाळा कमी झालेला नाही.शहरातील पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी १७० कोटी रुपयांच्या सीसीटीव्ही निविदेत सुद्धा गौ़डबंगाल झाल्याचा आरोप आज केला.

MLA Anna Bansode & PCMC
Mla Kailas Patil News : ठाकरे सरकारने मंजुरी दिलेल्या क्रीडा संकुलाची जमीन, शिंदे सरकारने परत घेतली..

पिंपरी शहरात सीसीटीव्ही (CCTV) बसविण्याची निविदा ही विशिष्ट खासगी कंपनी डोळ्यांसमोर ठेवून काढली गेल्याचा दावा आमदार बनसोडेंनी केला. त्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘इ एन्ड वाय’या सल्लागार कंपनीचे नितीन जैन यांनी फक्त एकच खासगी कंपनी पात्र ठरु शकेल अशा अटीशर्थी या निविदेत टाकल्या.

त्यामुळे फक्त एकच कंपनी पात्र ठरू शकेल अशी व्यवस्था केली आहे का? अशी शंका आमदार अण्णा बनसोडें(Anna Bansode) नी आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना विचारली आहे. या प्रक्रियेत शासकीय कंपन्यांनाही सहभागी करुन घ्यावे,अशी लेखी मागणी त्यांनी केली.अन्यथा विशिष्ट कंपनीसाठी प्रशासन मनमानी कारभार करीत असाल, तर विधानसभा सभागृहात आवाज उठवू असा इशारा त्यांनी दिला.

MLA Anna Bansode & PCMC
Rahul Gandhi News: राहुल गांधींना वाढदिवसाच्या भावी पंतप्रधान म्हणून शुभेच्छा; ठाण्यातील बॅनरची चर्चा

पब्लिक सेक्टर युनिट्स (PSU)असलेल्या देशातील अग्रगण्य संस्था उदा. बेल, रेलटेल, टाटा या कंपन्या सीसीटीव्ही कामात गुणवत्ता आणि दर्जेदार आहेत. मात्र, त्या या निविदा प्रक्रियेत पात्र ठरणार नाहीत,अशी तजवीज करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

एचपी (HP)या एकाच कंपनीची उत्पादने डोळ्यांसमोर ठेवून निविदा ग्राह्य होईल असे तांत्रिक स्पेसिफिकेशन त्यात आहे.मात्र,ते सर्व उच्च दर्जाच्या कंपन्यांना व पुरवठादार एजन्सींना ग्राह्य धरु शकेल, अशा प्रकारचे असणे अपेक्षित आहे असे आमदार(MLA) बनसोडे यांचे म्हणणे आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.