Loksabha Election 2024 : राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकात पुण्यातील आमदार टिंगरे, तुपे, भरणे आणि शेळके...

Shivsena शिवसेनेच्या या लिस़्टमध्ये भाजपचेही नेते आहेत. मात्र, राष्ट्रवादीने फक्त आपल्याच नेत्यांना स्थान दिले आहे.
Sunil Tingre, Chetan Tupe, Sunil Shelke, Datta Bharne
Sunil Tingre, Chetan Tupe, Sunil Shelke, Datta Bharnesarkarnama
Published on
Updated on

Pimpari New : भाजप, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाल्याने महायुतीतील हा त्रिकोण आज पूर्ण झाला. फक्त भाजप, शिवसेनेपेक्षा त्यांची प्रचारकांची संख्या तीनने कमी (३७)आहे. आता आघाडीतील पक्ष कधी आपली ही लिस्ट जाहीर करतात, याची प्रतीक्षा आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सचिवांना पाठविलेल्या या यादीत पुणे शहरातील आमदार सुनील टिंगरे (वडगाव शेरी),चेतन तुपे (हडपसर),तर जिल्ह्यातील सुनील शेळके (मावळ) आणि दत्ता भरणे (इंदापूर) यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या या लिस़्टमध्ये भाजपचेही नेते आहेत.

मात्र, राष्ट्रवादीने त्यात फक्त आपल्याच नेत्यांना स्थान दिले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, प्रवक्ते अमोल मिटकरी या पक्षाच्या तोफा राज्यातील लोकभा प्रचारात धडाडणार आहेत. पक्षाचे राज्यातील जवळपास सर्वच कॅबिनेट मंत्री स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. यादीत राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

Sunil Tingre, Chetan Tupe, Sunil Shelke, Datta Bharne
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे या कॅबिनेट मंत्र्यांसह आमदार इंद्रनील नाईक, नितीन पवार, विक्रम काळे, सतीश चव्हाण हे स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. के. शर्मा, सय्यद जलालुद्दीन, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार सतीश चव्हाण, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी या पदाधिकाऱ्यांनाही या यादीत स्थान देण्यात आलेले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Sunil Tingre, Chetan Tupe, Sunil Shelke, Datta Bharne
Pimpari Chinchwad Politics : चंद्रकांत नखातेंनी दुसऱ्यांदा वाढवले आमदार जगतापांचे टेन्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com