Political Horoscope: सीमेवरील तणाव कायम; संघर्षाचा भडका उडणार...

India Pakistan operation-sindoor Live: शस्त्रसंधीवरून सत्ताधारी-विरोधक यांच्यामध्ये वाक्-युद्ध रंगतील. घातपाताच्या घटना या काळात संभवतात. भारत-पाक युद्धामुळे देशाची प्रतिमा उंचावेल. दहशतवादी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे, पंतप्रधानांचे कौतुक होईल.
India Pakistan operation-sindoor Live
India Pakistan operation-sindoor LiveSarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

१७ ते २३ मे या सप्ताहातील ग्रहयोगाचा विचार करता युद्धाचे वातावरण या सप्ताहात कायम राहण्याची शक्यता असून, सीमेवर तणावपूर्ण स्थिती अनुभवास येईल. भारत-पाकिस्तान दोन्ही देशांतील चर्चा सुरू राहणार असली, तरी दोन्ही देशांकडून आक्रमक वक्तव्ये होतील. दोन्ही देशात वाक्-युद्ध चालू राहील.

पाकिस्तानकडून खोटी विधाने होतील. अफवा पसरविल्या जातील. पाकिस्तानकडून इतर देशांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न होतील, मात्र त्यांचा खोटारडेपणा उघडकीस येईल. सीमेवर पुन्हा मोठ्या संख्येने लष्कराची जमवाजमव सुरू होईल, या जोडीला देशांतर्गत महत्त्वाच्या व्यक्ती, मंदिरे, महत्त्वाच्या वास्तू यांना घातपात, स्फोटके घटना, हल्ल्यांचे प्रयत्न होतील.

या काळात राजकीय वातावरण गरम राहील. शस्त्रसंधीवरून सत्ताधारी-विरोधक यांच्यामध्ये वाक्-युद्ध रंगतील. काही नेत्यांविरोधात निदर्शन होतील. मोठ्या व्यक्तींवर हल्ले किंवा अपघात, घातपाताच्या घटना या काळात संभवतात. भारत-पाक युद्धामुळे देशाची प्रतिमा उंचावेल. दहशतवादी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे, पंतप्रधानांचे कौतुक होईल.

India Pakistan operation-sindoor Live
Tejasvi Ghosalkar: घोसाळकरांची नाराजी ठाकरे दूर करतील का? 'मातोश्री'वरील भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर काय म्हणाल्या?

पुढील काळात शनी-मंगळाचा षडाष्टक योग असल्यामुळे युद्धजन्य स्थिती कायम राहू शकते. देशात लपून बसलेले दहशतवादी, नक्षलवादी हिंसा घडविण्याचे प्रयत्न करतील. बेकायदेशीर परदेशी नागरिकांवर कारवाया होतील, मोठे गुन्हेगार पकडले जातील किंवा मारले जातील. पोलिस, लष्करावर हल्ल्याचे प्रयत्न होतील.

या काळात महागाईमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून, पेट्रोल, डिझेल, लोखंड यांच्या भावात मोठी वाढ होईल. तुरुंग, हॉस्पिटल या ठिकाणी तोडफोड, हिंसा होण्याची शक्यता राहील. मोठी विमान दुर्घटना होण्याची शक्यता असून, पाकिस्तानने आगळीक केल्यास पुन्हा एअर स्ट्राइक होण्याची शक्यता असून, क्षेपणास्त्रांचा वापर होऊ शकतो. शत्रूची विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्रे पाडले जातील. पाकिस्तानकडून भारताच्या अटी-शर्तींना विरोध होण्याची शक्यता असून, शस्त्रसंधी किंवा शांतता कराराचा भंग होण्याची शक्यता या काळात राहू शकते.

मोठ्या राजकीय व्यक्ती, कलाकार, गायक, संगीतकार यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात. हॉटेल, बँका, सराफी दुकाने यांच्यावर दरोड्याच्या घटना या काळात वाढण्याची शक्यता राहील.भूकंप, वादळे, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता वाटते. काही राजकीय व्यक्ती, कलाकार किंवा मोठ्या स्त्रीवर कायदेशीर कारवाई संभवते.

रवी-हर्षल युतीमुळे मोठ्या पक्षात फूट पडेल. युती-आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता राहील. केंद्र व राज्य मंत्रिमंडळामध्ये अचानक मोठे बदल, खांदेपालट होण्याची शक्यता वाटते. मंत्री, मुख्यमंत्री, मोठे अधिकारी यांच्यात अनपेक्षित बदल किंवा बदली होऊ शकते. राजकीय क्षेत्रात काही अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता असून, त्यामधून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वाटते. मोठ्या राजकीय व्यक्तीच्या मृत्यूमुळे मोठे बदल संभवतात.

India Pakistan operation-sindoor Live
Bhushan Gavai Judge Journey :भूषण गवई न्यायाधीश कसे झाले? आईनं सांगितला वडीलांसोबतचा 'तो' किस्सा

महागाईमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून, पेट्रोल, डिझेलची दरवाढ होईल. थांबविण्यात आलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू होईल. खेळाडूंसाठी हा काळ अनुकूल राहील. गुजरात, मुंबई या संघाना विजेतेपदाची सर्वाधिक संधी राहील. शेअर मार्केटसाठी हा काळ प्रतिकूल राहून मार्केटमध्ये घसरण संभवते. सोन्या-चांदीच्या भावात घसरण होईल. लेखक, साहित्यिकांचे गौरव, मानसन्मान होतील. जातीय सलोखा वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील.

साप्ताहिक राशिभविष्य (१७ ते २३ मे २०२५)

मेष : सप्ताहात कामाचा व्याप वाढणार आहे. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. शुक्र-मंगळ शुभयोगामुळे वाहन, जागा, घरविक्रीसाठी अनुकूल काळ आहे.

वृषभ : सुरुवातीला नवीन संधीचा लाभ होईल. ओळखीमधून मोठी कामे होतील.जवळच्या व्यक्तींकडून फसवणूक संभवते. कला, क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल.

मिथुन : प्रवास जपून करावेत. सुरुवात कष्टदायक राहील. नोकरी-व्यवसायात गोंधळाची स्थिती राहील. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. शुक्र-मंगळ शुभयोगामुळे कुटुंबातील कलह मिटेल.

कर्क : सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी मतभेद संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रगतीमध्ये अडथळे संभवतात. मात्र, शुक्र-मंगळ शुभयोगामुळे धार्मिक, मंगलकार्य होईल.

सिंह : सप्ताहात आरोग्य नरम-गरम राहील. दगदग होईल. हितशत्रूंचा उपद्रव होईल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

कन्या : कोर्टकचेरीची कामे करावी लागतील. भागीदारीच्या व्यवसायात बदल होतील. नोकरीमध्ये गोंधळाची स्थिती राहील. हाताखालच्या लोकांकडून मनस्ताप संभवतो. तरुणांचे विवाह जमतील.

तूळ : सप्ताहात घर, जागा, प्रॉपर्टीच्या कामांत कायदेशीर अडथळे येतील. घरातील वातावरण खराब राहील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने नवीन प्रवेश घेण्यात अडचणी येतील.

वृश्चिक : सप्ताहात छोटे प्रवास होतील. भावंडे/नातेवाइकांशी संबंध सुधारतील. महत्त्वाची कागदपत्रे, करार होतील. घर, जागेविषयी महत्त्वाची कामे मार्गी लागतील. संततीविषयी काळजी राहील.

India Pakistan operation-sindoor Live
Pune Police: गजा मारणेची पार्टी पुणे पोलिसांना भोवली! नियम धाब्यावर बसवून ढाब्यावर मारला मटणावर ताव

धनू : आर्थिक गोष्टींचे नियोजन होईल. घर, जागा, वाहन खरेदीसाठी गुंतवणूक होईल. कौटुंबिक समस्येवर तोडगा निघेल. छोटे प्रवास, सहली होतील. मित्रमंडळी, नातेवाइकांच्या भेटी होतील.

मकर : सप्ताहात मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कला, संगीत, मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. पैशाची कामे मार्गी लागतील. आनंदाची बातमी कळेल. सहली, छोटे प्रवास होतील.

कुंभ : सप्ताहात मोठे खर्च कराल. कौटुंबिक समस्यांवर मार्ग काढावा लागेल. शुक्र-मंगळ शुभयोगामुळे मोठे कर्ज मंजूर होईल. तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळेल. शत्रूवर मात कराल.

मीन : सप्ताहात जुनी येणी वसूल होतील. मोठ्या प्रवासाचा बेत आखाल. मन आनंदी, उत्साही राहील. शुक्र-मंगळ शुभयोगामुळे नवीन संधी उपलब्ध होतील. विवाहसौख्य उत्तम राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com