Political Horoscope: राजकीय क्षेत्रात अनेक अनपेक्षित बदल; अमेरिकेची आर्थिक स्थिती ढासळणार..?

Rashi Bhavishya : पुढील तीन महिन्यांत व पुढील वर्षात या ग्रहयोगाचा परिणाम अनुभवास येऊ शकतो. लग्नेश भाग्यस्थानी असल्यामुळे पुढील वर्ष देशाचे नावलौकिक, प्रतिष्ठा वाढविणारे राहील
Bhavishyanama 12.jpeg
Bhavishyanama 12.jpegSarkarnama
Published on
Updated on

सिध्देश्वर मारटकर-

सायन मेष संक्रमण कुंडलीमध्ये सिंह लग्न उदित असून, भाग्यस्थानी रवी, बुध, शुक्र, पंचमांत चंद्र, अष्टमात शनी, राहू, नेपच्यून, दशमात हर्षल, लाभात गुरू व व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती आहे. पुढील तीन महिन्यांत व पुढील वर्षात या ग्रहयोगाचा परिणाम अनुभवास येऊ शकतो. लग्नेश भाग्यस्थानी असल्यामुळे पुढील वर्ष देशाचे नावलौकिक, प्रतिष्ठा वाढविणारे राहील. निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला (भाजपला) यश मिळण्याची शक्यता राहील.

दशमात हर्षल असल्यामुळे काही राज्यांतील नेतृत्व बदलण्याची शक्यता राहील. पुढील वर्षात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाजप व मित्रपक्षांचा वरचष्मा राहील. चतुर्मेश मंगळ व्ययस्थानी नीच राशीत असून, शनी अष्टमात असल्यामुळे विरोधी पक्ष निष्प्रभ ठरतील.

अष्टमातील शनी, राहू, नेपच्यून योगामुळे नवीन वर्षात मोठे पूर, त्सुनामी, भूकंप, अतिवृष्टीमुळे मोठी जीवितहानी संभवते. या योगामुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्ग यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील. ज्येष्ठ राजकीय व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना पुढील वर्षात संभवतात. भाग्यातील बुध, शुक्र- लेखक, साहित्यिक, कलाकार यांच्यासाठी अनुकूल आहे.

Bhavishyanama 12.jpeg
Onion Export Duty : कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठी बातमी: केंद्र सरकारचा निर्यात शुल्काबाबत 'हा' महत्त्वाचा निर्णय

दशमातील हर्षलमुळे नवीन वर्षात राजकीय क्षेत्रात अनेक अनपेक्षित बदल होतील. देश व राज्यात नेतृत्व बदलाचे संकेत मिळतील. मंत्रिमंडळात (Cabinet) मोठे बदल होतील. अष्टमातील शनी, राहू, नेपच्यून योगामुळे मोठे विमान, जहाज अपघात पुढील वर्षात संभवतात. या योगामुळे संसर्गजन्य विकाराची भीती आहे.

ब्रिटनमधील राजकीय गोंधळ वाढण्याची शक्यता असून, देशाच्या प्रमुखावर आरोप होतील. अमेरिकेमध्ये (America) नवीन वर्षात आर्थिक स्थिती ढासळू शकते. डॉलरचे मूल्य कमी होईल. चीनमध्ये नवीन वर्षात प्रमुख व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता राहील. विषाणूचा धोका नवीन वर्षात कायम राहू शकतो. रशियन-युक्रेन युद्धजन्य स्थिती कायम राहील. युद्ध, स्फोट घटनांमधून मोठी जीवितहानी संभवते. पाकिस्तान व बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता कायम राहील.

Bhavishyanama 12.jpeg
Aditya Thackeray Letter : वातावरण तापलेलं असतानाच आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

साप्ताहिक राशिभविष्य

२२ मार्च ते २८ मार्च

मेष : भाग्य स्थानातील चंद्र-मंगळ प्रतियोग छोटे प्रवास, तीर्थयात्रा घडवून आणणारे आहेत. मात्र, नातेवाइकांशी मतभेद टाळावेत. दशमातील चंद्र-गुरूचा शुभयोग आर्थिक फायदा मिळवून देईल. व्यापारात मोठे लाभ होतील.

वृषभ : सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी. चंद्र-मंगळ प्रतियोगामुळे मोठा खर्च होईल. स्पष्ट बोलण्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होईल. दशमातील चंद्र-शनी युतीमुळे नोकरी, व्यवसायात अधिकार, जबाबदारी वाढेल.

मिथुन : सप्ताहाच्या सुरुवातीला वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. जोडीदाराशी मतभेद संभवतात. भागीदारीच्या व्यवसायात मनस्ताप संभवतो. विमा, वारसा हक्काची कामे होतील. दूरच्या प्रवासाची संधी मिळेल. मात्र, प्रवास जपून करावेत.

Bhavishyanama 12.jpeg
Chandrababau Naidu: चंद्राबाबू नायडूंचं तिरुपती मंदिराबाबत पुन्हा मोठं विधान, वाद पेटणार? आधी लाडू प्रसाद अन् आता हिंदू...

कर्क : सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील. नोकरीमध्ये मनस्ताप संभवतो. अनावश्यक खर्च करावे लागतील. मात्र, तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीत फायदा होईल. कोर्टकचेरीमध्ये अनुकूल निकाल लागतील.

सिंह : सप्ताहाच्या सुरुवातीला संततीविषयी चिंता राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेत अडथळे संभवतात, शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान संभवते. मात्र चंद्र-गुरू शुभयोगामुळे नवीन नोकरीची संधी मिळेल. हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल.

कन्या : सप्ताहाच्या सुरुवातीला घर, जागेविषयी कामे होतील. मन चिडचिड होईल. घरातील वातावरण गरम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून मनस्ताप संभवतो. मात्र, चंद्र-गुरू शुभयोगामुळे संततीचे प्रश्न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठे यश मिळेल.

तूळ : सप्ताहाच्या सुरुवातीला छोटे प्रवास होतील. भावंडे, नातेवाइकांशी मतभेद टाळावेत. खेळाडू, कलाकारांना स्पर्धेत मोठे यश मिळेल. मात्र, वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. जागा प्रॉपर्टीचे व्यवहार होतील. नवीन वाहन खरेदी होईल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून लाभ होतील.

वृश्चिक : सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास जपून करावेत. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अपघात, उष्णतेचे विकार संभवतात. बोलण्यातून वादविवाद संभवतात. भावंडांची विशेष काळजी घ्यावी लागेल. चंद्र-गुरू शुभ योगामुळे तरुणांचे विवाह जमतील. कलाकारांना यश, प्रसिद्धी मिळेल.

धनू : सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी खटके उडतील. वादविवाद, कोर्टकचेरीच्या कटकटीपासून दूर राहावे. भागीदारीमध्ये मनस्ताप संभवतो. नवीन नोकरीची संधी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

Bhavishyanama 12.jpeg
Harshvardhan Sapkal : 'ज्या वास्तुत कार्यकर्ता म्हणून झोपलो तेथेच प्रदेशाध्यक्ष म्हणून आलो...', सपकाळांनी 'तो' किस्सा सांगितला

मकर : सप्ताहाच्या सुरुवातीला मोठे प्रवास होतील. मात्र, प्रवासात चोरांपासून सावध राहावे. नोकरीमध्ये बदल, बदली संभवते. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. शेअर्समध्ये फायदा मिळेल. संततीविषयीचे प्रश्न मार्गी लागतील. मन उत्साही व आनंदी राहील.

कुंभ : सप्ताहाच्या सुरवातीला मुलांकडून मनस्ताप संभवतो. विद्यार्थ्यांना परीक्षा कष्टदायक राहील. शेअर मार्केटपासून दूर राहा. प्रेमप्रकरणात मतभेद संभवतात. घर, जागा, वाहन खरेदीसाठी खर्च होतील. घरात धार्मिक, मंगलकार्य होतील. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याची तक्रार राहील. एकटेपणा जाणवेल.

मीन : सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरी व्यवसायात मोठे बदल, बदली संभवतात. घरापासून दूर जावे लागेल. घर, जागेच्या कामात कटकटी संभवतात. मानसिक स्थिती खराब राहील, मात्र चंद्र-गुरू शुभयोगामुळे मित्रपरिवार, नातेवाइकांची चांगली मदत होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com