Horoscope : भविष्यनामा: अवकाळी पाऊस, शेअर मार्केटमध्ये घसरण, राजकीय क्षेत्रात वाद, निलंबनाच्या घटना, कसा असणार आठवडा..?

Weekly Horoscope : अवकाश यंत्रणेमध्ये बिघाड संभवतो. अपहरण, चोरी, फसवणूक, भ्रष्टाचार यांच्या गुन्ह्याचे प्रमाण मोठे राहील. सायबर क्राइम वाढेल.
Bhavishyanama
Bhavishyanama Sarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

१३ एप्रिल २०२५च्या पौर्णिमान्त कुंडलीमध्ये मीन लग्न उदित असून, सप्तमातून पौर्णिमा होत आहे. लग्नस्थानी रवी बरोबर शनी, राहू, शुक्र, बुध, नेपच्यून अशी ग्रहांची गर्दी आहे; तर सप्तमात चंद्र-केतू तृतीयात गुरू-हर्षल, पंचमात मंगळ, व लाभात प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे. ग्रहस्थितीचा विचार करता चित्रा नक्षत्रातील पौर्णिमा हवेतील मोठी उष्णता वाढीसाठी पोषक राहील. उष्णता वाढून अवकाळी पाऊस होईल.

काही देशात किंवा समुद्र किनारी वादळे, त्सुनामी किंवा पूर यासारख्या घटनांमधून मोठी हानी संभवते. या काळात मोठी विमान किंवा जहाज दुर्घटना होण्याची शक्यता राहील. व्यय स्थानातील ग्रहांची गर्दी आंतरराष्ट्रीय परिषद किंवा जागतिक समस्येवर अनेक देश एकत्र येऊन मोठे निर्णय घेण्याची शक्यता राहील.

जागतिक तापमान, संसर्गजन्य विकार, परदेशगमनाविषयी मोठे निर्णय घेतले जातील. विमानसेवा विस्कळित होण्याची शक्यता राहील. व्हिसा/पासपोर्ट यांचे नियमात बदल होतील. मोठ्या व्यक्तींचे परदेश दौरे होतील. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक स्पर्धा, खेळ यांचे भव्य आयोजन होईल.

Bhavishyanama
Sushil Kumar Shinde : वसंतराव नाईकांनी मला 1974 मध्ये दहा हजार रुपये दिले होते; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितली ‘ती’ आठवण!

शुक्र-शनी-राहू-बुध-नेपच्यून योगामुळे या काळात मोठे कलाकार, लेखक, साहित्यिक, राजकीय व्यक्ती यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात. लहान मुले, विद्यार्थी यांचेसाठी हा महिना प्रतिकूल राहील. या काळात मोठे संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता राहील. अवकाश यंत्रणेमध्ये बिघाड संभवतो. अपहरण, चोरी, फसवणूक, भ्रष्टाचार यांच्या गुन्ह्याचे प्रमाण मोठे राहील. सायबर क्राइम वाढेल.

अनेकांना आर्थिक नुकसान संभवते. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण संभवते. सोन्या-चांदीच्या भावात घसरण होईल. स्त्रीवर्ग, कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल राहील. सेलेब्रिटी किंवा मोठ्या स्त्री यांना कायदेशीर कारवाई, बंधनयोग, फसवणूक, अपहरण किंवा मृत्यूच्या घटना या काळात वाढण्याची शक्यता राहील.

Bhavishyanama
Amit Shah News: एकनाथ शिंदेंची थेट अजितदादांच्या अर्थखात्याविषयी तक्रार; शाहांनी थेट 'सह्याद्री'वर बैठकच लावली..?

सेलिब्रेटीचे प्रेमप्रकरण, घटस्फोट या काळात गाजतील. मोठ्या व्यक्तींवर विनयभंगाचे किंवा बलात्काराचे आरोप, गैरप्रकार होतील. मोठे सेक्स स्कँडल उघडकीस येतील. मोठे हॉटेल, तुरूंग, हॉस्पिटल यामधील गुन्हे, गैरप्रकार वाढतील. त्यांच्यावर कारवाई होईल.

स्त्रियांवरील, लहान मुले, मुली यांच्यावरील अत्याचाराच्या घटना या काळात वाढण्याची शक्यता राहील. शाळा, कॉलेज, विद्यापीठ, अभ्यासक्रम, महत्त्वाच्या परीक्षा यांच्यामध्ये गोंधळ, पेपरफुटीच्या घटना गाजतील. मंगळ-प्लुटो प्रतियोगामुळे या काळात मोठे भूकंप, वादळे, मोठे रेल्वे, वाहन अपघात यातून मोठी हानी संभवते. हवेतील उष्णतेमध्ये या महिन्यात विक्रमी तापमानाची नोंद होईल. या योगामुळे मोठ्या स्फोटक घटना, अतिरेकी कारवाया, हिंसा, जाळपोळ, खून, हाणामारी या घटना भारतासह अनेक देशांमध्ये या महिन्यात अनुभवास येतील.

काही देशांमध्ये मोठे युद्ध या काळात भडकण्याची शक्यता वाटते. सीमेवर ताणतणाव, युद्धजन्य स्थिती संभवते. काश्मीर, उत्तर भारतात भूकंप, भूस्खलन, मोठी हिंसा होण्याची शक्यता राहील. तृतीयेतील गुरूमुळे मोठ्या धार्मिक सामाजिक/कला क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू संभवतो. मात्र, या काळात मोठे सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमाची रेलचेल राहील.

Bhavishyanama
Devendra Fadnavis: CM फडणवीसांची मोठी खेळी, एकेकाळी प्रशासन हादरवणारा 'हा' धडाकेबाज अधिकारी पुन्हा टीममध्ये दाखल होणार?

विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होईल. राजकीय क्षेत्रात मोठे वाद संभवतात. या काळात मोठा पक्ष फुटण्याची शक्यता असून, एखादे राज्य सरकार अल्पमतात येऊ शकते. सत्तांतर किंवा मुख्यमंत्री बदल होऊ शकतो. प्रमुख व्यक्ती, नेत्याच्या मुख्य पदावरील व्यक्तीचा मृत्यू किंवा निलंबनाच्या घटना संभवतात. मोठ्या व्यक्तींवर हल्ले, घातपात शक्य राहील.

साप्ताहिक राशिभविष्य

१२ ते १८ एप्रिल

मेष : सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत अनुकूल बदल होतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दूरचे प्रवास होतील. सप्ताहाच्या शेवटी मोठे आर्थिक लाभ होतील. घर, प्रॉपर्टीची कामे होतील.

वृषभ : सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांच्या समस्या सुटतील. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. तरुणांचे विवाह जमतील. भावंडे, नातेवाइकांशी संबंध सुधारतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

मिथुन : सप्ताहाच्या सुरुवातीला घर, वाहन खरेदी होईल. नोकरी, व्यवसायात चांगले बदल होतील. जवळच्या व्यक्तींकडून मदत मिळेल. मुलांशी मतभेद संभवतात. विद्यार्थ्यांना सप्ताह कटकटीचा राहील.

कर्क : सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कागदपत्रे, करार होतील. मोठी बातमी कळेल. भावंडे, नातेवाइकांचा सहवास मिळेल. उत्तरार्धात मुलांच्या समस्या सुटतील. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल.

सिंह : सप्ताहाच्या सुरुवातीला मोठे लाभ होतील. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबात चांगली घटना घडेल. सप्ताहाच्या मध्यावर मोठे खर्च होतील. घर, वाहन खरेदी, दुरुस्तीसाठी खर्च होतील.

कन्या : आरोग्यात चांगली सुधारणा होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. भागीदारीसाठी मोठी संधी चालून येईल. येणी वसूल करताना कटकटी संभवतात. कुटुंबात कलह निर्माण होईल.

तुळ : सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा खर्च होईल. नोकरीमध्ये संभ्रमाची स्थिती राहील. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. मात्र, उत्तरार्धात पैशाची कामे होतील. कुटुंबाचे सहकार्य उत्तम राहील. येणी वसूल होतील.

वृश्चिक : तरुणांना जोडीदार मिळेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. मार्केटमधून फायदा होईल. सप्ताहाच्या मध्यावर दूरचे प्रवास होतील.

Bhavishyanama
Raju Shetti On Farmers issue : अकरावेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजित पवारांना कर्जमाफीचं आश्वासन देताना आर्थिक स्थिती माहित नव्हती का ?

धनु : सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीमध्ये बदल संभवतात. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील, मात्र प्रवास जपून करावेत. मोठ्या कर्जाची कामे होतील. गुंतवणूक कराल.

मकर : सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक, मंगल कार्य, तीर्थयात्रा होतील. कलाकारांना प्रसिद्धी नावलौकिक मिळेल. भावंडे, नातेवाइकांशी संबंध सुधारतील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

कुंभ : सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास जपून करावेत. वारसा हक्क, प्रॉपर्टीच्या कामात गोंधळ संभवतो. विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत अडथळे येतील. वरिष्ठांकडून मनस्ताप संभवतो.

मीन : सप्ताहाच्या सुरुवातीला वैवाहिक जीवनात आनंदाची घटना घडेल, तरुणांचे विवाह जमतील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास जपून करावेत. मुलांकडून मनस्ताप संभवतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com