RTO Fine: 'आरटीओ'चा मोठा दणका; दोन सुपरस्टार अभिनेत्यांना ठोठावला तब्बल 38 लाखांचा दंड

Amitabh Bachchan Aamir Khan Roll Royce Cars Fined: बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन आणि 'परफेक्शनिस्ट' अभिनेते आमिर खान यांच्याबाबत मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन्ही अभिनेत्यांच्या नावावर नोंदणी असलेल्या दोन आलिशान कारमुळे बेंगळुरूमध्ये मोठा टॅक्स वाद निर्माण झाला आहे.
amitabh bachchan and aamir khan.jpg
amitabh bachchan and aamir khan.jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. अमिताभ-आमिरच्या जुन्या गाड्यांवर रोड टॅक्स वाद: अमिताभ बच्चन व आमिर खान यांच्या नावावर असलेल्या रोल्स रॉयस गाड्यांवर बेंगळुरूमध्ये तब्बल 38.26 लाखांचा रोड टॅक्स दंड ठोठावण्यात आला.

  2. गाड्या 'केजीएफ बाबू'कडे, पण नावांतर नाही: व्यापारी युसूफ शरीफ उर्फ 'केजीएफ बाबू' यांनी या गाड्या विकत घेतल्यानंतरही त्या आपल्या नावावर नोंदवलेल्या नाहीत, म्हणून दंड आकारण्यात आला.

  3. कलाकारांचा थेट संबंध नाही: दोन्ही गाड्या वर्षांपूर्वी विकल्या गेल्या असून, कलाकारांचा या वादाशी थेट संबंध नाही; मात्र त्यांच्या नावांमुळे प्रकरण गाजले.

Karnatak News : बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन आणि 'परफेक्शनिस्ट' अभिनेते आमिर खान यांच्याबाबत मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन्ही अभिनेत्यांच्या नावावर नोंदणी असलेल्या दोन आलिशान कारमुळे बेंगळुरूमध्ये मोठा टॅक्स वाद निर्माण झाला आहे. कर्नाटक (Karnatak) मोटार वाहन कायद्यांतर्गत रोड टॅक्स न भरल्याबद्दल तब्बल 38.26 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Bengaluru RTO imposes ₹38.26 lakh fine on Rolls Royce cars registered in Amitabh Bachchan and Aamir Khan’s names for tax violations under Karnataka vehicle laws. Bollywood stars not directly involved)

बेंगळुरूचे व्यापारी युसूफ शरीफ उर्फ 'केजीएफ बाबू' यांना कर्नाटक मोटार वाहन कायद्यांतर्गत रोड टॅक्स न भरल्याबद्दल तब्बल 38.26 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड नाव हस्तांतरित न केल्यामुळे ठोठावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या रोल्स रॉयस फॅंटम या कारला 18.53 लाख तर आमिर खान यांच्या रोल्स रॉयस घोस्टला 19.73 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या कार अद्यापही महाराष्ट्रात नोंदणीकृत असून कागदोपत्री अमिताभ बच्चन आणि आमिर खान या दोन्ही अभिनेत्यांच्याच नावावर आहेत. कारण आजतागायत युसूफ शरीफ यांनी संबंधित कार या त्यांच्या नावावर हस्तांतरित केलेल्या नाहीत.

amitabh bachchan and aamir khan.jpg
Rohit Pawar: कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ कसा मिळाला? रोहित पवारांचा मोठा खुलासा

कर्नाटक सरकारच्या बेंगळुरू आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत एवढ्या मोठ्या रकमेचा दंड ठोठावला आहे. तसेच युसूफ शरीफने यांनी जर या प्रकरणात वैध कागदपत्रे सादर केली नाहीत, तर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही आरटीओ अधिकारी यांनी दिला आहे.

प्रकरण काय आहे?

कर्नाटकच्या नियमांनुसार, जर राज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ वाहन वापरले जात असेल तर स्थानिक पातळीवर त्याची पुन्हा नोंदणी करणे आणि रोड टॅक्स भरणे बंधनकारक आहे. आरटीओच्या मते, रोल्स रॉयस फॅंटम 2021 पासून बेंगळुरूच्या रस्त्यावर धावत होती आणि घोस्ट 2023 पासून, परंतु कर भरण्यात आला नाही.

amitabh bachchan and aamir khan.jpg
Nagpur News: कोर्टाचा एकाचवेळी भाजप आमदार दटके अन् काँग्रेसच्या ठाकरेंना मोठा दणका; दिले 'हे' निर्देश

नियमांचं उल्लंघन

रोल्स रॉयस फॅंटम पहिल्यांदा 2021 मध्ये कर न भरल्याबद्दल चिन्हांकित करण्यात आले होते. परंतु, त्यावेळी ही कार एका वर्षापेक्षा कमी काळ बेंगळुरूमध्ये होती, त्यामुळे कोणताही दंड आकारण्यात आला नव्हता. आता दोन्ही कार शहरात निर्धारित एका वर्षापेक्षा जास्त काळ वापरात आढळल्या, ज्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

'केजीएफ बाबू' कोण?

युसूफ शरीफ हे कर्नाटकच्या कोलार गोल्ड फील्ड (केजीएफ) प्रदेशातील एक प्रमुख व्यापारी आणि राजकारणी आहेत. ते 'केजीएफ बाबू' म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2021 च्या कर्नाटक एमएलसी निवडणुकीत 1 हजार 744 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली असूनही, त्यांनी या कारसाठी रोड टॅक्स भरला नाही किंवा त्या त्यांच्या नावावर नोंदणीकृतही केल्या नाहीत.

amitabh bachchan and aamir khan.jpg
Honey trap Scandal: हनी ट्रॅप प्रकरणात आता राष्ट्रवादीची उडी, म्हणाले, प्रफुल्ल लोढा याची नार्को टेस्ट होऊन जाऊ द्या!

अभिनेत्यांचा संबंध नाही...

या आलिशान कार कागदपत्रांवर अजून जरी अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या नावावर असल्या तरी, दोन्ही कलाकारांनी त्या अनेक वर्षांपूर्वी विकल्या होत्या. अमिताभची 'फँटम' 2019 मध्ये विकली गेली होती, तर आमिरच्या 'घोस्ट'ची विक्री नेमकी कधी झाली याबाबत स्पष्टता आलेली नाही. या प्रकरणात दोन्ही कलाकारांचा थेट संबंध नाही, परंतु त्यांच्या नावांमुळे याप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

  1. प्रश्न: अमिताभ बच्चन व आमिर खान यांच्यावर खरोखर दंड लागला का?
    उत्तर: दंड गाड्यांच्या नावावर लागला, पण कलाकारांचा थेट संबंध नाही.

  2. प्रश्न: हा दंड कोणत्या कारणावरून लावण्यात आला आहे?
    उत्तर: कर्नाटकात रोड टॅक्स न भरल्यामुळे दंड ठोठावण्यात आला.

  3. प्रश्न: गाड्या कोणाच्या ताब्यात आहेत?
    उत्तर: व्यापारी युसूफ शरीफ उर्फ 'केजीएफ बाबू' यांच्या ताब्यात आहेत.

  4. प्रश्न: ही कारवाई कोणत्या संस्थेने केली?
    उत्तर: बेंगळुरू आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com