Government Holiday : फडणवीस सरकारकडून 'लॉन्ग वीकेंडची' घोषणा : शासकीय कर्मचाऱ्यांना एक दिवस जास्तीची सुट्टी; GR प्रसिद्ध

Government Holiday : रक्षाबंधनानिमित्त मुंबईतील राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी 28 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 10 ऑगस्ट रोजी शुद्धीपत्रक जारी केले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने रक्षाबंधनानिमित्त 28 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भातील शासन शुद्धीपत्रक 10 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आले आहे.

यापूर्वी 5 सप्टेंबर 2026 रोजी गोपाळकाला (दहीहंडी) निमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता या सुट्टीऐवजी शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील शासकीय कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या अखेरीस सलग सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील कार्यालयांना लागू

शासनाने स्पष्ट केले आहे की ही स्थानिक सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Government GR : हायवेलगत अनधिकृत ढाबे-हॉटेल थाटलेत? अतिक्रमण काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा अल्टिमेटम; महाराष्ट्र सरकारने लगेचच GR प्रसिद्ध

शासनाच्या या निर्णयामुळे मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्टच्या अखेरीस लॉन्ग वीकेंडची संधी आहे. 28 ऑगस्टला शुक्रवारची सुट्टी असल्याने त्यानंतर शनिवार-रविवारची नियमित सुट्टी येणार आहे. त्यामुळे सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे.

5 सप्टेंबरची दहीहंडीची सुट्टी रद्द?

शासनाच्या नव्या आदेशानुसार 5 सप्टेंबर 2026 रोजीची गोपाळकाला (दहीहंडी) स्थानिक सुट्टी बदलण्यात आली आहे. तिच्या जागी 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी लागू करण्यात आली आहे. मात्र 5 सप्टेंबर रोजी शनिवार असल्याने ही सुट्टीही मिळणारच आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा 114 मासिकांवर सर्जिकल स्ट्राईक; राजपत्र जारी, धक्कादायक कारण आलं समोर...

या निर्णयामुळे मुंबईतील कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्टची सुट्टी ही मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील संबंधित शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com