IPS officer : फडणवीस सरकारचा 6 दिवसांत यू-टर्न: एका फटक्यात 16 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द, 14 जणांना नवीन नियुक्ती

IPS officer : महाराष्ट्र गृह विभागाने १५ मे रोजी केलेल्या १६ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अवघ्या सहा दिवसांत रद्द केल्या आहेत.
Maharashtra government cancels transfers of 16 senior IPS officers within six days and issues fresh postings for 14 officials.
Maharashtra government cancels transfers of 16 senior IPS officers within six days and issues fresh postings for 14 officials.sarkarnama
Published on
Updated on

राज्याच्या गृह विभागाने अवघ्या 6 दिवसांत तब्बल 16 वरिष्ठ यपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. गत आठवड्यात (15 मे) गृह विभागाने काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र, २१ मे रोजी यातील तब्बल १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. यातील 14 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आली आहे, तर 2 अधिकारी अद्याप पोस्टिंगच्या प्रतिक्षेत आहेत.

15 मेच्या आदेशानुसार नागपूर शहरचे पोलीस उपायुक्त म्हणून कुमाथ चिंथा यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर नित्यानंद झा यांच्याकडे यवतमाळचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. पण २१ मेच्या नव्या आदेशात या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना अद्याप नवीन नियुक्ती दिलेली नाही. इतर 14 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांचे नाव, 15 रोजीच्या आदेशातील बदलीचे ठिकाण आणि 21 मे रोजीच्या आदेशातील बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे :

1. कुमाथ चिंथा -

पोलीस उपायुक्त नागपूर शहर (15-05)

नवी नियुक्ती नाही (21-05)

2. नित्यानंद झा -

पोलीस अधीक्षक यवतमाळ शहर (15-05)

नवी नियुक्ती नाही (21-05)

3. अकबर पठाण -

पोलीस अकादमी, नाशिक (15-05)

बदली रद्द करून मुंबई शहर येथे नियुक्ती (21-05)

Maharashtra government cancels transfers of 16 senior IPS officers within six days and issues fresh postings for 14 officials.
IPS Transfers: राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका! DIG, SP, SPS, IGP दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

4. दीपक गिऱ्हे -

पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर (15-05)

बदली रद्द करून पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक (21-05)

5. प्रवीण पडवळ -

विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र (15-05)

विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हिआयपी सुरक्षा, दादर (21-05)

6. संजय येनपुरे -

विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हिआयपी सुरक्षा, दादर (15-05)

विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र (21-05)

7. पंजाबराव उगले -

विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ (15-05)

पोलीस सहआयुक्त, ठाणे शहर (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर हे पद उन्नत करून) (21-05)

Maharashtra government cancels transfers of 16 senior IPS officers within six days and issues fresh postings for 14 officials.
IPS Vishwas Nangre Patil : आचारी बदला म्हणण्याची हिंमत झाली नाही, हीच स्थिती सध्या देशाची! विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने पोस्ट व्हायरल, सरकारनेच केला खुलासा

8. महेश पाटील -

विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय), मुंबई (15-05)

विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती परिक्षेत्र) (21-05)

9. संभाजी कदम

पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे (15-05)

पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे (21-05)

10. संजय सरगौडा पाटील

पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड शहर (15-05)

पोलीस उपायुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार (21-05)

11. विक्रांत देशमुख -

पोलीस उपायुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार (15-05)

पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड शहर (21-05)

12. प्रिती टिपरे -

पोलीस उपायुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार (15-05)

सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई (21-05)

13. हिंमत जाधव -

पोलीस उपायुक्त, मुंबई शहर (15-05)

अपर पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे (21-05)

14. रमेश चोपडे -

उपायुक्त, सागरी सुरक्षा, मुंबई (15-05)

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड (21-05)

15. तानाजी चिखले -

डायल 112 (15-05)

अपर पोलीस अधिक्षक, परभणी (21-05)

16. बाळासाहेब पाटील -

पोलीस उपायुक्त, मुंबई शहर (15-05)

पोलीस उपायुक्त, ठाणे शहर (21-05)

दरम्यान, अवघ्या 6 दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्याने आणि नवीन नियुक्ती दिल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या निर्णयामागे काही प्रशासकीय कारणे होती का? की पोलीस दलातील अंतर्गत नाराजी किंवा राजकीय दबाव कारणीभूत होता? असा सवाल विचारला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com