RTO News : पावसामुळे पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाच्या कामकाजात बदल

Pimpri-Chinchwad RTO : पावसामुळे आरटीओ कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे. त्यामुळे अर्जदारांच्या अपॉइंटमेंटमध्ये बदल करण्यात आले आहे.
Pimpri-Chinchwad RTO
Pimpri-Chinchwad RTOsarkarnama
Published on
Updated on

RTO News : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथील दैनंदिन कामकाजात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. आज (दि. ६ जुलै) IDTR येथील वाहनचालक चाचणी तसेच शिकाऊ लर्निंग लायसन्स चाचणीसाठी उपस्थित राहू न शकलेल्या अर्जदारांनी आपली अपॉइंटमेंट स्वतःच्या सोयीनुसार पुन्हा निश्चित (रिशेड्यूल) करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

चारचाकी वाहनांच्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी डिमांड ड्राफ्ट (DD) जमा करण्याची मुदत दि. ७ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत वाढविण्यात आली असून, एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित क्रमांकाचा लिलाव दि. ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे.

योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate) नूतनीकरणासाठी दि. ६ जुलै रोजी आलेल्या वाहनांची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या दैनंदिन क्षमतेनुसार पुढील सात दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून, उर्वरित वाहनधारकांनी आपली वाहने दि. ११ जुलै २०२६ रोजी सादर करावीत.

तसेच मंचर शिबिरासाठी दि. ६ जुलैची अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत दि. १० जुलै २०२६ रोजी पुनर्नियोजित करण्यात आली आहे. मुसळधार पावसाची परिस्थिती कायम राहिल्यास पुढील बदलांविषयी स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

7 जुलैपासून फेसलेस सेवा सुरू

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन दुचाकी वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची फेसलेस (ऑनलाईन) सेवा 7 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात कार्यान्वित असून, कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांनी ही सेवा घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून वापर करता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com