Pune District Court Judge : पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी एम. के. महाजन

Pune District Court Judge : महाजन हे मूळचे जळगाव जिल्ह्यातले..
Pune District Court Judge
Pune District Court Judge Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यासह राज्यातील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, वरिष्ठ व कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आणि कौटुंबिक न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी दिले. मुंबईतील धर्मादाय आयुक्त एम. के. महाजन यांची पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Pune District Court Judge
NCP Crisis: मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष काकाचा की पुतण्याचा ? लेखी सबमिशन सादर करण्याचा शेवटचा दिवस

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य निबंधक आर. एन जोशी यांनी गुरुवारी सायंकाळी याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांची रत्नागिरी जिल्हा आणि सत्र न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाजन मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील असून, त्यांचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण जामनेर येथे झाले.

महाजन यांनी जळगाव येथील एस .एस.मणियार लॉ कॉलेजमधून विधी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर महाजन यांनी दिवाणी आणि फौजदारी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1997 ते 2008 पर्यंत महाजन यांनी सहायक सरकारी वकील म्हणून वाशीम, जामनेर आणि धुळे येथे काम केले.

Pune District Court Judge
Ajit Pawar Speech : कोर्ट-कचेरीच्या लढाईत अजिबात लक्ष घालायचं नाही; अजितदादांनी दमच भरला!

महाजन यांची 2 मे 2008 रोजी जिल्हा न्यायाधीश म्हणून चंद्रपूर येथे नियुक्ती झाली. त्यांनी नांदेड येथे जिल्हा न्यायाधीश, मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात सदस्य म्हणून काम पाहिले. मुंबई येथे शहर दिवाणी आणि सत्र न्यायाधीश (लाचलुचपत प्रतिबंधक विशेष न्यायालय) आणि मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, नागपूर येथे प्रशासकीय न्यायाधीश म्हणून काम केले. बुलढाणा येथे त्यांनी मुख्य न्यायाधीशपदी ते होते. 26 मे 2022 रोजी महाजन यांची मुंबईत धर्मादाय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com