UPI Services : देशभरात UPI सेवा 45 मिनिटे बंद राहणार; 'SBI'ने दिली माहिती, कारण आलं समोर

SBI UPI Downtime, SBI UPI Maintenance, SBI UPI Payment : एसबीआय बँकेने यूपीआय सेवा बंद राहणार असल्याची माहिती दिली असली तरी ग्राहकांच्या सेवेसाठी यूपीआय लाइट ही सेवा सुरू राहणार आहे.
UPI Payments
UPI PaymentsSarkarnama
Published on: 
Updated on: 

SBI UPI Service Update : देशभरात सध्या यूपीआयच्या माध्यमातून दररोज मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. सर्वच बँकांकडून त्यासाठी ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतीय स्टेट बँकेची ही सेवा १९ नोव्हेंबरला ४५ मिनिटे बंद राहणार आहे. बँकेकडून ही माहिती देण्यात आली आहे.

काय म्हटले आहे SBIने?

SBI कडून सोशल मीडियात याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नियोजित देखभाल-दुरूस्तीच्या कामामुळे ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजू १५ मिनिट ते दोन वाजेपर्यंत एसबीआय बँकेची यूपीआय सेवा तात्पुरती उपलब्ध असणार नाही. हे काम लवकरही पूर्ण होऊ सकते.

UPI लाइट

एसबीआय बँकेने यूपीआय सेवा बंद राहणार असल्याची माहिती दिली असली तरी ग्राहकांच्या सेवेसाठी यूपीआय लाइट ही सेवा सुरू राहणार आहे. बँकेने म्हटले आहे की, ग्राहक कोणत्याही अडथळ्यांशिवाय यूपीआय लाइट सेवांचा वापर सुरू ठेऊ शकतात. ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत.

UPI Payments
RBI News : रिझर्व्ह बँकेचा 63 फायनान्स कंपन्यांना दणका; थेट परवानाच रद्द, महाराष्ट्रातील कंपन्यांचाही समावेश

यूपीआय लाइट या सेवेमध्ये जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यंत व्यवहार करता येतात. तर वॉलेटमध्ये कमाल पाच हजार रुपये ठेवता येतात. एसबीआयची यूपीआय सेवा बंद असल्याच्या काळात ग्राहकांना यूपीआय लाइट सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. यूपीआय सेवा सुरळीत झाल्यानंतर नियमित व्यवहार करता येतील.

UPI Payments
Gokul Dairy News : 'गोकुळ'मध्ये मोठा धमाका; प्रशासकांनीच फोडलं तत्कालीन संचालक मंडळाचं बिंग, निर्णयांवर थेट प्रहार

दरम्यान, बुधवारी काही तांत्रिक कारणांमळे एसबीआय योनो (YONO SBI) सेवेतही काही काळ अडथळे आले होते. हे बँकेचे एकात्मिक डिजिटल बँकिंग आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म आहे. एकाच ॲपद्वारे बँकिंग व्यवहार, यूपीआय (UPI) पेमेंट्स, गुंतवणूक, कर्ज आणि ऑनलाइन शॉपिंग यांसारख्या अनेक सेवा ग्राहकांना वापरता येतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.