Assembly Election 2024 : सोलापुरात विधानसभेची जय्यत तयारी; 22 हजार कर्मचारी, 3723 मतदान केंद्रे अन्‌ 4900 ईव्हीएम

Solapur District Administration : मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून जनजागृतीसाठी ईव्हीएम मशीनचे व्हॅन जिल्ह्यातील गावोगावी फिरवण्यात आले आहे.
Assembly Election 2024
Assembly Election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 October : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात 22 हजार कर्मचारी विधानसभा निवडणुकीचे काम पाहणार आहेत. हे सर्व कर्मचारी जिल्ह्यातील एकूण 3 हजार 723 मतदान केंद्रावर निवडणुकीचे काम पाहणार आहेत. तसेच, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने गावोगावी ईव्हीएम मशीनचे व्हॅन फिरविण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 723 मतदान केंद्रावर विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

या मतदान केंद्रावर तब्बल 22 हजार कर्मचारी निवडणुकीचे काम पाहणार आहेत. या कर्मचाऱ्यांची यादीही सोलापूर (Solapur) जिल्हा निवडणूक कार्यालयाने तयार केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठीची सोलापूर जिल्ह्यातील प्रस्तावित 3723 मतदान केंद्राची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ईव्हीएम मशिनची पडताळणीही पूर्ण झाली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्या ईव्हीएम मशीन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाठविल्या जाणार आहेत.

Assembly Election 2024
Solapur NCP : महेश कोठेंच्या आमदारकीत पुन्हा एकदा मनोहर सपाटेंचा अडथळा?

विधानसभेसाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण 38 लाख मतदार असून मतदानासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर 4900 ईव्हीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. या ईव्हीएम मशिनची प्राथमिक चाचणीही झालेली आहे. त्यामुळे निवडणूक कामासाठी वापरण्यास ही ईव्हीएम यंत्रे तयार करून ठेवण्यात आली आहेत.

निवडणूक कामाचे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर होणार आहे. तसेच, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून जनजागृतीसाठी ईव्हीएम मशीनचे व्हॅन जिल्ह्यातील गावोगावी फिरवण्यात आले आहे.

Assembly Election 2024
Ajit Pawar Politics : जनसन्मान यात्रेने अजितदादांना सोलापुरात काय दिले? दोन आमदार अपक्ष लढणार, पाटलांनी पक्ष सोडला...

निवडणूक खर्चाची मर्यादा

निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना निवडणुकीत खर्चाच्या मर्यादेचे बंधन आखून देण्यात आलेले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. निवडणुकीत 40 लाखांपेक्षा जास्त खर्च केला तर निवडणूक आयोगाकडून त्याबाबत संबंधित उमेदवाराला विचारणा केली जाते. संबंधित उमेदवाराला त्याबाबत आयोगापुढे खुलासा करावा लागतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com