Talathi Death News : माढ्यातील तलाठ्याने सांगलीत संपवलं जीवन...

Solapur News : माढा तालुक्यातील रहिवासी तलाठी सुखदेव गजानन डोईफोडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते गेल्या दहा वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर सांगलीतील मिरज प्रांत कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते.
Sukhdev Doifode
Sukhdev DoifodeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli, 03 October : मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रहिवासी असलेले तलाठी सुखदेव गजानान डोईफोडे (वय ५०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते प्रतिनियुक्तीवर सांगली जिल्ह्यातील मिरज प्रांत कार्यालयात गेल्या १० वर्षांपासून लिपिक म्हणून कार्यरत होते.

तलाठी सुखदेव डोईफोडे हे गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

माढा तालुक्यातील तलाठी सुखदेव डोईफोडे हे गेली दहा वर्षांपासून मिरज प्रांत कार्यालयात लिपिक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांनी पत्नीला रात्री नऊच्या सुमारास घराबाहेर पाठवले. त्यानंतर त्यांनी घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी घरी आल्यानंतर आत्महत्येची घटना उघडकीस आली.

Sukhdev Doifode
Ramraje Naik Nimbalkar : रामराजेंनी जिल्हा बँकेची सूत्रं सोडली? ‘सध्या मी रिटायर्ड आहे’ म्हणत दिले संकेत...

सुखदेव डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. डोईफोडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मिरज पोलिस याबाबत तपास करीत आहेत. मिरज पोलिस डोईफोडे कुटुंबीय आणि इतरांकडे चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधत आहेत.

Sukhdev Doifode
Satara Dcc Bank Election : भाजपनं अखेरच्या क्षणी डाव टाकला; राष्ट्रवादी-शिवसेनेला चर्चेत गाफील ठेवत ‘बी प्लॅन’ केला ॲक्टिव्ह!

मिरज प्रांत कार्यालयात सुखदेव डोईफोडे यांनी १० वर्षे काम केल्यामुळे त्यांचा महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी नियमित संपर्क होता. डोईफोडे यांच्या आत्महत्येमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com