Pune Crime News : पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी तरुणाला भोवली; पुण्यात गुन्हा दाखल

PM Narendra Modi Defamation Case : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी
PM Narendra Modi Birthday
PM Narendra Modi BirthdaySarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : सोशल मीडियावरील ट्रोलिंगचं प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. राजकीय नेत्यांना या ट्रोलिंगचा सगळ्यात मोठा फटका बसत असतो. याचवेळी पुण्यातून एक खळबळजनक बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात 31 वर्षीय सागर सावंत या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रवींद्र पडवळ यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यासह हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

PM Narendra Modi Birthday
PM Narendra Modi News :'चित्तोडगड'मधून पंतप्रधान मोदींची तोफ धडाडली; राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला ?

सुजित खेडकर या मित्राच्या सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टला प्रत्युत्तर देताना आरोपी सागर सावंत याने पंतप्रधान मोदी आणि हिंदू देवदेवतांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. आता लोणीकंद पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आमदार अस्लम शेख यांना जिवे मारण्याची धमकी...

काँग्रेसचे नेते आणि मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. गोल्डी ब्रार बोलत असल्याचे सांगत एका अज्ञात व्यक्तीकडून अस्लम शेख यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी रविवारी बांगूरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्लम शेख यांच्या फोनवर 5 ऑक्टोबरला सकाळी दहाच्या दरम्यान फोन आला. हा फोन शेख यांच्या पीएने घेतला. या वेळी दोन दिवसांत आमदार अस्लम शेख यांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख गँगस्टर गोल्डी ब्रार अशी सांगितली आहे.

(Edited By DeepaK Kulkarni)

PM Narendra Modi Birthday
Mumbai Senate Elections: सिनेट निवडणूक स्थगिती विरोधातील याचिकेवर सोमवारी फैसला ? हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.