घरांवर पक्षाचा झेंडा फडकावत भाजप कार्यकर्त्यांनी केला स्थापनादिन साजरा...

BJP|Mai Dhore|Mahesh Landge : भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले आहे.
PCMC BJP, Mai Dhore
PCMC BJP, Mai DhoreSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : भाजप पक्षाचा (BJP) स्थापनादिन बुधवारी (ता.६ एप्रिल) देशभर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) पक्ष पदाधिकाऱ्यांनीही यानिमित्त आपल्या घरांवर पक्षाचा झेंडा फडकावला. तसेच त्यांनी शहरात अभिमान अभियान सुरु केले असून ते १० तारखेपर्यंत चालणार आहे.

PCMC BJP, Mai Dhore
मोदी सरकार जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष करतेय; शिवसेना खासदार बारणेंचा आरोप

भाजपच्या माजी महापौर माई ऊर्फ उषा ढोरे (Usha Dhore) यांनी शहर पक्ष कार्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपची कार्यकर्ती असल्याचा अभिमान आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या. शहर सरचिटणीस राजू दुर्गे, महिला शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आदी यावेळी उपस्थित होते.

PCMC BJP, Mai Dhore
भोसरीच्या रेडी रेकनर दरावरून आमदार लांडगेंची झाली पंचाईत; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी आज भाषण केले. त्याचे लाईव्ह प्रक्षेपण शहर भाजपने केले. त्यासाठी मंडल स्तरावरही स्क्रिन लावण्यात आले होते. पक्ष पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख व काही कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर पक्ष स्थापनादिनी पक्षाचा झेंडा फडकावला. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. त्यात शहरातील माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, प्रबुद्ध नागरिक यांचा सत्कारही करण्यात येणार आहे, असे पक्षाचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com