Ajit Pawar Last Phone Call : अजितदादांनी शेवटचा कॉल केला ते 'श्रीजित पवार' कोण? पवार कुटुंबियांशी जवळचं नातं

Ajit Pawar's last phone call with Srijit Pawar : अजित पवार यांनी या कॉलमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांना अध्यक्षपद दिल्याचे तसेच सुपे गटातही माळी समाजाला संधी दिल्याचे नमूद केलं आहे. तर आपण अजितदादांना मेसेज केलेला त्यानंतर त्यांनी कॉल करून मला उत्तर दिल्याचं श्रीजित पवार यांनी सांगितलं.
Deputy Chief Minister Ajit Pawar is seen during a public event in Baramati, amid revelations about his last phone call before the accident involving Shrijit Pawar.
Deputy Chief Minister Ajit Pawar is seen during a public event in Baramati, amid revelations about his last phone call before the accident involving Shrijit Pawar.Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Last Phone Call : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातापूर्वी केलेल्या अखेरच्या फोनवरील संभाषण आता समोर आलं आहे. अपघाताच्या दिवशी सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी अजितदादांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील श्रीजित पवार यांना फोन केला होता.

या फोन बाबतची माहिती श्रीजित पवार यांनी आज (ता.०४) बारामतीत पत्रकार परिषद घेत दिली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांसोबत झालेलं बोलणं सर्वांना ऐकवलं. या रेकॉर्डिंगनुसार फोनवर अजित पवार आणि श्रीजित पवार एका माळी समाजाच्या उमेदवारीबाबत संभाषण करत आहेत.

अजित पवार यांनी या कॉलमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांना अध्यक्षपद दिल्याचे तसेच सुपे गटातही माळी समाजाला संधी दिल्याचे नमूद केलं आहे. तर आपण अजितदादांना मेसेज केलेला त्यानंतर त्यांनी कॉल करून मला उत्तर दिल्याचं श्रीजित पवार यांनी सांगितलं.

Deputy Chief Minister Ajit Pawar is seen during a public event in Baramati, amid revelations about his last phone call before the accident involving Shrijit Pawar.
Sharad Pawar Statement: अजितदादांच्या स्मारकाबाबत शरद पवार म्हणाले, "ज्या जागेची चर्चा केली, त्या संस्थेचा मी..."

मात्र, अजितदादांना शेवटचा फोन करणारे श्रीजित पवार नेमके कोण आहेत ते जाणून घेऊया. श्रीजित यांचं पूर्ण नाव श्रीजित अरविंद पवार असं आहे. गोविंदराव पवार हे शरद पवरांचे वडील तर अजित पवार यांचे आजोबा होते.

Deputy Chief Minister Ajit Pawar is seen during a public event in Baramati, amid revelations about his last phone call before the accident involving Shrijit Pawar.
Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार, पार्थ पवार अन् जय पवारांमध्ये बैठक, अजितदादांची बहीणही उपस्थित; विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय?

गोविंदराव पवार यांचे सख्खे बंधू ग्यानबा पवार व गुलाबराव पवार होते. ग्यानबा पवार यांचे चिरंजिव असलेल्या तुकाराम पवार यांचे श्रीजित हे नातू आहेत. या नात्याने अजित पवार यांचे श्रीजित पवार हे पुतणे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com