Pune News, 22 Apr : बांधकाम व्यवसायकांशी निगडित असलेल्या क्रीडाई महाराष्ट्र संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभाला सोमवारी (ता.21) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली.
या सोहळ्यात अजितदादांनी (Ajit Pawar) आपले व्याही बांधकाम व्यवसाय सतीश मगर यांना एक सल्ला दिला आहे. ज्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरजार चर्चा सुरू आहे. मगरपट्टा सिटीचे संस्थापक सतीश मगर यांच्या कन्या या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पत्नी आहेत.
या नात्याच्या अनुषंगाने बोलताना अजितदादांनी सतीश मगर यांना उद्देशून एक मिश्किल सल्ला दिला आहे. अजित पवार पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी बांधकाम व्यावसायिकांशी निगडीत असलेल्या क्रीडाई संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "क्रीडाई या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.
या पंचवीस वर्षाच्या दरम्यान संस्थेकडून ह्युमन विंग काढण्यात आली. मात्र या पंचवीस वर्षांमध्ये एकही महिला अध्यक्ष झालेली नाही. या ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृती सुरू आहे. मात्र, तुम्ही सध्या प्रशासनात पाहिले तर आपल्या मुख्य सचिव सुजाता सैनिक या महिला आहेत.
ज्यांच्यावर राज्यातील सर्व पोलिसांची जबाबदारी आहेत अशा पोलिस महासंचालक देखील रश्मी शुक्ला या महिला आहेत. जयश्री भोज या पर्यावरणाच्या प्रधान सचिव आहेत. यासह अनेक लाडक्या बहिणी आमच्या उच्च पदावर ती आहेत.
आम्हाला जेवढं जास्त महिलांना प्राधान्य देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे 25 वर्षानंतर आता किमान दोन वर्षांसाठी तरी महिलेला क्रीडाईचं अध्यक्ष करा, तेवढं व्याही माझं जरा ऐका, तुमची मुलगी माझी सून आहे, अशी मिश्किल टिपप्णी अजित पवारांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.