Ajit Pawar Vs Vijay Shivtare: पुरंदरचे 'बापू' बारामतीत अपक्ष म्हणून उभे राहिले, तर शिवसेनेचे राज्यभरातील उमेदवार अडचणीत येणार

Baramati Loksabha Election 2024 : गतवेळी विधानसभेला अजितदादांनी शिवतारेंना सांगून पाडले होते. त्याचा बदला या वेळी लोकसभेला त्यांनी घेण्याचे ठरवले आहे. काऱण...
Ajit Pawar, Vijay Shivtare
Ajit Pawar, Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : महायुतीतील शिवसेनेचे विजय शिवतारे तथा बापू हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याविरोधात अचानक आक्रमक झाले असून, बेलगाम वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे बापूंचा हिशेब करण्याची भाषा अजितदादांचे कट्टर समर्थक आमदार मावळचे सुनीलअण्णा शेळके यांनी यापूर्वी लगेच केली, तर गुरुवारी (ता.२१) त्यांचे दुसरे खंबीर पाठीराखे आमदार पिंपरीचे अण्णा बनसोडे यांनी, तर शिवतारे म्हणजे शिवसेना, जर युतीधर्म पाळणार नसतील, तर राष्ट्रवादीही तो राज्यभर पाळणार नाही, असा कडक इशारा दिला.

शिवसेना युतीधर्म पाळणार नसेल, आम्हीही तो पाळणार नाही, असा इशारा मावळचे आमदार शेळकेंनीही बापूंचा समाचार घेताना लगेचच (ता.19) दिला होता. तसेच शिवतारेंनी माफी मागण्याची मागणी त्यांनी केली होती, अन्यथा मावळात त्यांच्या पक्षाच्या म्हणजे शिवसेना उमेदवाराचे काम करणार नाही, असे ते म्हणाले होते. हीच भूमिका पिंपरी-चिंचवड अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीनेही त्याच दिवशी घेतली. त्यानंतर पिंपरीचे आमदार बनसोडे, तर आज अधिक आक्रमक झाल्याने बापूविरोधातील रोष अजितदादांचे अतिशय आवडीचे अशा शहरात प्रचंड वाढल्याचे स्पष्ट झाले.

Ajit Pawar, Vijay Shivtare
Rani Lanke News : नगर दक्षिणमध्ये लंके कुटुंबीयच 'तुतारी' वाजवणार; राणी लंकेंचा यांचा दावा!

शेळकेंचे मावळ आणि बनसोडेंचे पिंपरी विधानसभा मतदारसंघ हे मावळ लोकसभा मतदारसंघात आहेत. तेथे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच पुन्हा उमेदवार जवळपास नक्की आहेत. बापूंचा अजितदादांविरोधातील सूर कायम राहिला आणि ते बारामतीत लोकसभेला अपक्ष उभे राहिले, तर मावळात त्याचा तोटा बारणेंना, तर फायदा आघाडीचे उमेदवार ठाकरे शिवसेनेचे संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Waghere Patil) यांना होणार आहे. कारण मावळ आणि पिंपरीच्या वरील दोन्ही आमदारांनी तटस्थ भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अण्णा बनसोडेंनी, तर एक पाऊल पुढे जात शिवतारे म्हणजे शिवसेना, जर युतीधर्म पाळणार नसेल, तर राष्ट्रवादीही तो राज्यभर पाळणार नाही, शिवसेनेच्या उमेदवारांना विरोध करू, असा इशारा त्यांनी गुरुवारी दिल्याने राज्यातील शिवसेनेचे उमेदवार अडचणीत येणार आहेत. गतवेळी लोकसभेला बारणे यांनी अजितदादांचे पुत्र पार्थ यांचा पराभव केला होता. त्याचा हा बदला ही आमची भावना नाही, त्याच्याशी याचा काहीही सबंध नाही, असे बनसोडेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, गतवेळी विधानसभेला अजितदादांनी शिवतारेंना सांगून पाडले होते. त्याचा बदला या वेळी लोकसभेला त्यांनी घेण्याचे ठरवले आहे. कारण, सुनेत्रा पवार म्हणजे अजितदादांच्या पत्नी या बारामतीत उमेदवार असणार आहेत. त्यामुळे तेथे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) सुरू केली आहे. त्याजोडीने ते अजितदादांविरोधात शिवराळ भाषाही वापरू लागले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Ajit Pawar, Vijay Shivtare
Mahadev Jankar News: भाजप जानकरांचे दबावतंत्र मोडून काढणार की मनधरणी करणार..?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com