Video Sunetra Pawar : मोठी बातमी! शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या ‘मोदी बागे’त सुनेत्रा पवार; नेमकं काय घडलं?

Sharad Pawar News : सोमवारी राष्ट्रवादीचे नेते, छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे भेट दिली होती. त्यातच सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘मोदी बागे’ला भेट दिली आहे.
Sharad Pawar | Sunetra Pawar
Sharad Pawar | Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवसागणिक नव्या घडामोडी घडत असून, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी सकाळी भेट घेतली. त्यानंतर नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.

यातच भुजबळांच्या भेटीनंतर 24 तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी, खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील ‘मोदीबागे’तील निवासस्थानी भेट दिली.

या भेटीत सुनेत्रा पवार नेमक्या कोणाला भेटल्या, या भेटीत काय चर्चा झाली, याचा तपशील पुढे आला नाही. मात्र, सुनेत्रा पवार गेल्या तेव्हाच, ‘मोदीबागे’त पवारसाहेब आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या होत्या, असे सांगितले जात आहे. जवळपास तास-सव्वातास सुनेत्रा पवार मोदीबागेत होत्या; त्यामुळे या भेटीत नेमके काय घडले, असावे यावर आता नव्याने चर्चा सुरू झाल्या आहे.

पण, सुनेत्रा पवार यांची भेट घरगुती असू शकते, असेही सांगितले आहे. या भेटीबाबत अद्याप कोणीही काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Sharad Pawar | Sunetra Pawar
Dada Bhuse On Chhagan Bhujbal : भुजबळांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर दादा भुसेंनी व्यक्त केली नाराजी

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. त्या निवडणुकीत सुळे यांनी तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळविला. त्यानंतर काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यात आले.

Sharad Pawar | Sunetra Pawar
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : आरक्षणासाठी शरद पवारांना भेटलेल्या भुजबळांची जरांगेंनी पुन्हा शाळा घेतली; नेमके काय म्हणाले?

याबाबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमोरे यांनी म्हटलं, “छगन भुजबळांनी शरद पवारसाहेबांची घेतलेली भेट हा स्वतंत्र विषय झाला. पण, भुजबळांच्या भेटीमागे अनेक राजकीय अर्थ आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून भुजबळांची कोंडी झाली आहे. भुजबळांच्या भेटीला तो संदर्भ आहे. सुनेत्रा पवार जर ‘मोदी बागे’त जाऊन शरद पवारसाहेबांना भेटल्या की माहिती नाही. सुनेत्रा पवार आणि शरद पवारसाहेबांची ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असू शकते.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com