Amit Shah : अजितदादांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा अमित शहा आश्चर्यचकीत झाले; नंतर काय घडलं? शहांनी सर्वच सांगितलं

Amit Shah : पुणे जिल्हा परिषदेमध्ये आज दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं तसंच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराचं अजितदादांच्या नावाचं नामकरण सोहळा पार पडला.
Amit Shah Spoke about Ajit Pawar entry in Mahayuti
Amit Shah Spoke about Ajit Pawar entry in MahayutiSarkarnama News
Published on: 
Updated on: 

Amit Shah Spoke about Ajit Pawar Mahayuti Entry : पुणे जिल्हा परिषदेमध्ये आज दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं तसंच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराचं अजितदादांच्या नावाचं नामकरण सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गृहमंत्र्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या स्वभावाचं, कार्यपद्धतीचं कौतुक केलं, तसंच महायुतीत सामिल होण्याच्या त्यांच्या निर्णयावेळच्या घडामोडींचा उल्लेखही केला.

अमित शहा म्हणाले, "अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला की त्यांना महायुतीसोबत यायचं आहे. तेव्हा मला थोडसं आश्चर्य वाटलं होतं. मी त्यांना विचारलं होतं की, दादा तुमचं एक बॅकग्राऊंड आहे, या निर्णयामुळं जनतेला आणि सगळ्यांनाच झटका बसेल. हा निर्णय तुम्ही का घेत आहात? सत्ता तर येत-जात असते पण तुम्ही इतका मोठा निर्णय का घेत आहात? त्यावर त्यांनी म्हटलं की, प्रत्येक गोष्टीचा एक कालखंड असतो, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळं आता देशाचा विकास आणि महायुती या दोघांना वेगळं ठेवता येणार नाही. मला महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासोबत यायचं आहे, त्यामुळं मला महायुतीचं सदस्य व्हायचं आहे. थोडसा उशीर झाला आहे, दोन-तीन वेळेला प्रयत्न झाले पण अंतिमतः ते स्वतः हयात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीची सदस्य बनली"

Amit Shah Spoke about Ajit Pawar entry in Mahayuti
Drought Maharashtra: दुष्काळाची भीषण स्थिती! महाराष्ट्र अन् राजस्थानच्या मेंढपाळांमध्ये संघर्ष; मोठा पोलीस फौजफाटा अन् प्रशासनाची यशस्वी मध्यस्थी; नेमकं काय प्रकरण?

महायुतीत आल्यानंतर त्यांच्याशी माझं नातं घनिष्ट बनलं. त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीत भक्कमपणे अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी माझ्याशी आणि देवेंद्र फडणवीसांशी चिवटपणे झगडा केला. अशा प्रकारे लढणारे नेते खूप कमी असतात जेव्हा एखादा नेता वरिष्ठ पदावर असतो तेव्हा तो आपल्या नात्यांचा जास्त विचार करतो, पण अजितदादांनी कायम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबतच्या आपल्या नात्याचा विचार केला. हा त्यांचा कार्यकर्ता होण्याचा खूप मोठा गुण आहे, जो आपण सर्वांनी त्यांच्याकडून शिकला पाहिजे.

अजितदादांच्या महायुतीत येण्यानं महायुतीत स्थिरता आली, निरंतरता आली त्यामुळं कठोर निर्णय महायुती सरकार घेऊ शकलं, अशा प्रकारे महाराष्ट्रातील सरकार सुरु होतं. पण अचानक दादा आपल्या सर्वांमधून निघून गेले. सकाळी साडेआठच्या दरम्यान मला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला आणि प्राथमिक माहिती अशी आहे की, ज्या प्रकारे घटना घडली त्यानुसार, जखमींच्या वाचण्याची शक्यता कमी आहे, तेव्हा मी हृदयानं, मनानं सुन्न झालो. इतका मोठा माणूस अशा दुर्घटनेचा शिकार झाला. त्यानंतर पाऊण तासात तर त्यांच्या मृत्यूचं रुग्णालयातून कन्फर्मेशन आलं.

Amit Shah Spoke about Ajit Pawar entry in Mahayuti
Hardeep Singh Puri: हरदीपसिंग पुरी यांचा खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा! नेमकं काय घडलंय?

एक काम करणारा माणूस वेळेआधीच निघून गेला, हे फार मोठं नुकसान महाराष्ट्रासाठी आहे. ते काम करणारे होते, कामाचे देखील होते. पण ईश्वरानं त्यांना वेळेआधीच आपल्याजवळ बोलावून घेतलं याचं शैल्य आपल्या सर्वांनाच आहे. पण त्यांनी जे काम केलं आणि कामाची पद्धत निर्माण केलं, त्यामध्ये वेळ आणि शिस्त होती, त्यांची ही कार्यशैली येणाऱ्या काळात तरुणांसाठी एक मोठं विद्यापीठ बनले याचा मला विश्वास आहे, अशा शब्दांत अमित शहा यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.