पुणे भाजपचे रणशिंग फुंकण्यासाठी अमित शहांचा दौरा ठरला..

सहकारमंत्री झाल्यानंतर अमित शहा (Amit Shah) यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.
Amit Shah

Amit Shah

Sarkarnama 

Published on
Updated on

पुणे : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) १८ व १९ डिसेंबरला दोन दिवसांच्या नगर-मुंबई आणि पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनानंतर प्रवरानगरला सहकार परिषद व पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत.पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

<div class="paragraphs"><p>Amit Shah</p></div>
राज ठाकरेंचा पुणे दौरा निवडणुकीची दिशा ठरवणार ?

सहकार मंत्री झाल्यानंतर शाह यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.या दौऱ्यात शाह पुण्यातील वैकुंठभाई मेहता सहकारी व्यवस्थापन संस्थेला भेट देणार आहेत.शाह यांचा दौरा गेल्या महिन्यात ठरला होता. मात्र, काही कारणाने हा दौरा रद्द करण्यात आला.१८ डिसेंबरला शाह शिर्डीला भेट देणार आहेत.साईबाबांचे दर्शन घेऊन ते प्रवरानगरला येणार आहेत.भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आयोजित केलेल्या सहकार परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Amit Shah</p></div>
हिंम्मत असेल तर सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने घ्यावी

१८ डिसेंबरला नगर व मुंबईतील दौरा करून शाह रात्रीच्या मुक्कामाला पुण्यात येणार आहेत.१९ डिसेंबरला शाह यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावण तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन करणार आहेत. कार्यक्रमानंतर गणेश कला क्रिडा केंद्र येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.या दौऱ्यात शाह स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या शिवसृष्टीला भेट देण्याची शक्यता आहे.पुरंदरे यांच्या पर्वती येथील घरीदेखील शाह भेट देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com