मोठी बातमी : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक

Avinash Bosale | काहीच दिवसांपूर्वी सीबीआयने त्यांच्या कार्यालयावर छापेमारी केली होती.
Avinash Bosale
Avinash BosaleSarkarnama
Published on
Updated on

(CBI Arrested builder Avinash Bosale)

पुणे : पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. येस बँक-डीएचएफएल प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. ३० एप्रिल रोजी भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल या कार्यालयावर सीबीआयकडून छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले हे काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. (Avinash Bosale Latest News)

अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सक्त वसुली संचालनालयाने गेल्या वर्षी दणका दिला होता. त्यांची ४०.३४ कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेशखिंडमध्ये असलेल्या त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या मुख्यालयावर ईडीने ही कारवाई केली होती. त्यानंतर ३० एप्रिल रोजी सीबीआयने त्यांच्याशी संबंधित संपत्तींवर छापेमारी केली होती.

मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास "सीबीआय'कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे. दरम्यान, याच बॅंक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, "सीबीआय'कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात "सीबीआय'ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती.

भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून त्यांचा मुंबई व पुण्यात बांधखाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील भोसलेनगर व डेक्कन जिमखाना परिसरात त्यांची प्रशस्त कार्यालये आहेत. तर पाषाणमध्ये येथे भोसले यांचे आलिशान निवासस्थान आहे. भोसले यांना यापूर्वीही विदेशातून कर चुकवून मौल्यवान चीजवस्तू घेऊन येताना सीमाशुल्क विभागाने विमानतळावर ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गुरुवारी सायंकाळी भोसले यांना त्यांच्या घरातुन अटक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com