

पुणे : नव्या मंत्रिमंडळात आपल्याला जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास विभागाचं कॅबिनेट मंत्रीपद मिळावं, अशी मागणी माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली आहे. ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण विभागासह बऱ्याच विभागांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. कॅबिनेट मंत्रीपदांवरून (Cabinet Minister) बच्चू कडू नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते पहिल्यांदाच राज्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या दिवशी सुरतला जाणाऱ्या आमदारांमध्ये बच्चू कडू यांचा समावेश होता.शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत आजही ते गोव्यात आहेत. आपल्याला ग्रामीण विगाभाशी निगडीत विभाग मिळावा तसेच कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.
प्रहार संघटनेच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आंदोलने उभारली आहेत.अपंगाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.त्यांनी केलेली वैशिष्टयपूर्ण आंदोलने गाजली आहेत.
येत्या आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपा, अपक्ष, शिंदे गट व इतर छोट्या पक्षांचे अनेक आमदार मंत्रीमंडळात समावेश होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रत्येक आमदार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे.मात्र, सर्व मिळून ४३ मंत्रीपदे आहेत.त्यापेक्षा जास्त मंत्री करता येत नाहीत.त्यामुळे शिंदे गट, अपक्ष व छोट्या पक्षांच्या अपेक्षा पाहता भाजपाच्या आमदारांना मोठ्याप्रमाणात त्याग करावा लागणार असल्याचे दिसत आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.