Baramati News, 19 Oct : बारामती विमानतळ परिसरात राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेची कशी दुर्दशा झाली आहे हे दर्शविणारे हे वृत्त असल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बारामतीसारख्या महत्त्वाच्या शहरात आणि विमानतळ परिसरात अशा प्रकारे गोळीबाराची घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रविवारी (ता. १८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास राणा सूर्यवंशी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा संदर्भ देत सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. 'राज्यातील कायदा सुव्यवस्थेची कशी दुर्दशा झाली आहे, हे दर्शविणारे हे वृत्त आहे,' अशा शब्दांत त्यांनी या घटनेवर भाष्य केले. सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या घटनेवर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "राणा शिपींग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती एअरपोर्टच्या परिसरात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. सुदैवाने ते यातून बचावले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेची कशी दुर्दशा झाली आहे हे दर्शविणारे हे वृत्त आहे. गुन्हेगार सहजासहजी गोळीबार करुन निघून जातात आणि गृहखात्याची यंत्रणा काहीच करु शकत नाही. लोक दहशतीखाली असून गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे का अशी स्थिती आहे. गृहखात्याने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन हल्लेखोरांना अटक करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करावी." अशी मागणी सुळेंनी आपल्या पोस्टमधून केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.