Baramati Assembly Bypoll Results : बारामती विधानसभा निवडणुकीत बिचकुले, करुणा मुंडेंची अब्रुच निघाली, पहिल्या फेरीत अवघी 7 मतं

Sunetra Pawar Abhijit Bichukale Karuna Munde : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत अभिजित बिचकुले आणि करुणा मुंडे हे उमेदवार होते. मात्र, सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय होताना दिसत आहे.
Abhijit Bichukale
Abhijit Bichukalesarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News : बारामती विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. या निकालामध्ये पहिल्या दोन फेऱ्याची मतमोजणी पुर्ण झाली आहे. दोन्ही फेऱ्यांमध्ये १६ हजार ८४३ मतांची मोजणी झाली. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांना १६ हजार ५४३ मतदान झाले आहे.तर, विरोधकांना अवघे 300 मतं या दोन फेऱ्यांमध्ये मिळाली आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या विरोधात करुणा मुंडे, अभिजित बिचकुले हे देखील निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, पहिल्या फेरीत सुनेत्रा पवार यांना 8 हजार 868 मतं मिळाली तर,

अभिजीत बिचकुले यांना केवळ 7 तर, करुणा मुंडे यांना फक्त 10 मतं मिळाली आहेत. तर, चंद्रकात वाघमोडे या उमेदवाराला 5 मतं मिळाली आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी माघार घेत सुनेत्रा पवार यांना पाठींबा देण्यात आला होता. मात्र, अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्याने येथे बिनिवरोध निवडडणूक झाली नाही.

Abhijit Bichukale
Sunetra Pawar News: सुनेत्रा पवारांविरुद्ध 9 बारामतीकर; बारामतीत नशीब आजमावण्यासाठी 13 बाहेरील उमेदवार मैदानात

सुनेत्रा पवारांचा एकतर्फी विजय...

सुरुवातीच्या कलांमध्ये सुनेत्रा पवार हे मोठ्या प्रमाणात आघाडीवर दिसून येत आहे. अपक्ष उमेदवार दुहेरी मतदान देखील पहिल्या फेरीत मिळवू शकले नाहीत. त्यामुळे सुनेत्र पवार या एकतर्फी विजय होतील असा अंदाज आहे.

Abhijit Bichukale
Baramati Bypoll Result 2026: मताधिक्याचा विक्रम मोडण्यासाठी सुनेत्रा पवारांचं पहिलं पाऊल! पहिल्याच फेरीमध्ये 99 टक्के मते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com